Subscribe Us

header ads

वर्षावास अधिष्ठान समारोप, धम्मदेसना व भोजनदानचे आयोजन

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड (प्रतिनिधी) धम्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धम्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धम्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने, मग तो कोणत्याही तथाकथित धर्माचा असो वंशाचा वा देशाचा असो,माणूस म्हणून त्याने धम्माकडे वळावे. याच मार्गाचा प्रचार बुद्धांच्या नंतर अनेक भिक्खु आणि उपासकांनी केला.आधुनिक काळात बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती नंतर पुन्हा एकदा बुद्धाचा विचार वाढीस लागला. यात सर्वात मोठे भिक्खुंचे धम्म प्रचारकाचे योगदान होय.भिक्खुंच्या प्रचंड धम्मप्रचारानेच लोक शुद्ध धम्म समजून घेतात आणि घेत आहेत. बीड शहरात पु. भिक्खु धम्मशील धम्म प्रचाराच्या निमित्ताने बुद्ध विहारात वर्षावास काळात धम्म ज्ञानार्जन करून धम्म विचाराचा प्रचार प्रसार मोठ्या जलद गतीने करत आहेत. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा-2021 हा वर्षावास कालावधी पु. भिक्खु धम्मशील यांचा 9 वा वर्षावास आहे. या त्यांच्या 9 व्या वर्षावास समारोपाच्या निमित्ताने मंगळवार दि. 19/10/2021 रोजी सम्राट अशोक बुद्धविहार, बलभीम नगर,पेठ बीड. येथे वर्षावास अधिष्ठान समारोप,धम्मदेसना व भोजनदान आयोजन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सकाळी 6:30 वा. सम्राट अशोक बुद्धविहार येथे बुद्ध वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ होणार असून सायं. 6 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते सम्राट अशोक बुद्धविहार,बलभीम नगर ,पेठ बीड. पर्यंत धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायं. 7 वा. प्रमुख धम्मदेसना पु. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूर्णा. व पु.भिक्खु धम्मशील, बीड. देणार आहेत. ​ याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपासक आयु.अमरसिंह ढाका (हेड पोस्ट मास्टर,बीड), आयु.प्रा. प्रदीप रोडे (अध्यक्ष,देवगिरी प्रतिष्ठान, बीड.), आयु. राजु जोगदंड (सामाजिक कार्यकर्ते, बीड) इत्यादी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिका यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून वेळेवर उपस्थित राहून धम्मदेसनेने लाभान्वित व्हावे. असे आवाहन सम्राट अशोक बुद्धविहार समिती, भिमशक्ती क्रीडा मंडळ व बलभीम नगर, पेठ बीड. येथील उपासक-उपासिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा