Subscribe Us

header ads

डॉ नितीन पडवळ यांची महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या अतिरिक्त जिल्हा समन्वयक पदी निवड

  प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे

प्रतिनिधी -  उस्मानाबाद दिनांक 1 ऑक्टोबर 2021 शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ नितीन पडवळ यांची महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या उस्मानाबाद जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य व तंत्रज्ञान विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2021 22 साठी उस्मानाबाद जिल्हा उच्च शिक्षण विभागा साठी अतिरिक्त जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये करिअर कट्टा या उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावा यासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ नितीन पडवळ यांना जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती मिळाल्यामुळे डॉ बाबासाहेब देशमुख अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघ पुणे ,शंकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीकृष्ण चंदनशिव ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ चंद्रकांत हिवरे, डॉ राम चव्हाण ,डॉ वेदपाठक ,विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद चे माजी संचालक डॉ अशोक दादा मोहेकर ,शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ दीपा सावळे ,महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, महाविद्यालयातील आयक्यू एसी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने, डॉ अतुल हुंबे, डॉ विद्याधर नलवडे, ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख ,आष्टी येथील उपप्राचार्य डॉ सुहास गोपने, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथील प्राचार्य डॉ सुनिल पवार , प्राणी शास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ हेमंत भगवान ,रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथील डॉ बाबासाहेब मोरे तसेच मराठवाड्यातील व महाराष्ट्र राज्यातील अनेक मित्रपरिवाराने डॉ नितीन पडवळ यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा