अवघ्या ९ महिन्यांत ४०४.५० रुपयांची वाढ
नमूद केल्याप्रमाणे, गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये देखील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती ७५ रुपयांनी वाढल्या होत्या. त्याआधी ऑगस्टमध्येही किंमती दुप्पटीने वाढल्या होत्या. खरं पाहायला गेलं तर, इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०२१ मध्ये आतापर्यंत एकूण ४०४.५० रुपयांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रति व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १३३२ रुपये इतकी होती. जी आता अवघ्या ९ महिन्यांत थोड्या थोड्या वाढ होऊन १७३६.५० रुपयांवर पोहोचली आहे.व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल्स, ढाबे आणि सार्वजनिक भोजनालयांमध्ये अधिक होतो. त्यामुळे, आता दर वाढल्याने हॉटेलिंग महाग होऊ शकतं. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती ८८४.५० रुपयांवर स्थिर आहेत.
0 टिप्पण्या