Subscribe Us

header ads

मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला अटक

संगमनेर_ संगमनेर तालुक्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले असून त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पीडित ११ वर्षीय चिमुकलीची आई २८ जुलैला काही कारणास्तव बाहेरगावी गेली होती. त्याचदिवशी रात्री पीडितेच्या पित्याने ती झोपेत असताना तिच्यासोबत गैरप्रकार केला. विशेष म्हणजे आरोपीने त्यानंतरही पुन्हा दोन वेळा पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. याच दरम्यान आई गावावरून घरी आल्यानंतर पीडितेने आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.  शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करत आहेत. वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी पोलिसांनी काटेकोर तपासणीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा