Subscribe Us

header ads

उसाच्या फडात ट्रॅक्टर भरल्यानंतर ते मागे घेतांना टायरखाली चिरडून एका चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू ; वाहन मालकांची दडपशाही

बीड स्पीड न्यूज 

बीड_ उसाच्या फडात ट्रॅक्टर भरल्यानंतर ते मागे घेतांना टायरखाली चिरडून एका चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्नाटक राज्यात २८ ऑक्टोंबर रोजी घडली. वडवणी तालुक्यातील देवगांव येथील ऊसतोड मजूर दाम्पत्य आपल्या चिमुकलीला घेवून नुकतेच कर्नाटकला उसतोडणीसाठी गेले होते. प्रेरणा किशोर कारके ( वय ४ वर्षे ) असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.किशोर हनुमंत कारके हे उसतोड कामगार आहेत. ते १८ ऑक्टोंबर २०२१ रोजी कारखान्याला गेले होते. दि. २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी ट्रॅक्टर ( क्र. एम. एच. ०९ सी.जे. ८९०७) उसाच्या फडात भरल्यानंतर ते मागे घेतांना प्रेरणा हिला ट्रॅक्टरने चिरडल्याने दुदैवी मृत्यू झाला. याबाबतचा गुन्हा नोंद होवू नये म्हणून वाहन मालकांनीच अरेरावीची भाषा वापरत मयत मुलीच्या नातेवाईकांना घटनेच्या ठिकाणाहून गांवाकडे हकलून दिले. दरम्यान या दुर्देवी घटनेची माहिती वडवणी आणि बीड येथील समाजिक स्तरावरील शिष्टमंडळाला माहिती झाल्यानंतर याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असून उद्या कारखान्याची भेट घेऊन झालेल्या अन्यायाची आणि घटनेची माहिती देणार आहेत. ही घटना कर्नाटक राज्यातील हिमरस या कारखान्या अंतर्गत तैराना ( ता . संकेसर जि . बेलगांव ) येथे आज दि.३० रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा