Subscribe Us

header ads

रोटरीचे अजून एक कौतुकास्पद कार्य संपन्न; ३९० जणांची मोफत नेत्र तपासणी

बीड स्पीड न्यूज 

अंबाजोगाई_समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य संवर्धन करण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रोटरीने आरोग्य जनजागृती चे काम सुरूच ठेवले आहे. असे गौरवोद्गार स्वा.रा.ती. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी केले.अंबाजोगाईत जागतिक दृष्टीदिना निमित्त रोटरी क्लब ऑफ  अंबाजोगाई सिटी व मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात  ३९० जणांची मोफत नेत्र तपासणी झाली.या शिबिराचे उदघाटन स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे हस्ते करण्यात आले.यावेळी  साहित्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्ष  कमल बरुरे,  मातोश्री हॉस्पिटल च्या नेत्र तज्ञ डॉ स्नेहल पेस्टे , डॉ नवनाथ घुगे ,  डॉ शिवराज पेस्टे, डॉ गणेश खंदारकर,रोटरी क्लबचे अध्यक्ष विवेक गंगणे, सचिव प्रा. रोहिणी पाठक, आनंद लोमटे,यांची  प्रमुख उपस्थिती होती.या वेळी बोलताना डॉ भास्कर खैरे म्हणाले की  "सध्य स्थितीत विविध आजारांमुळे डोळ्यांवर वेगवेगळे परिणाम होतात, आजार होतात, वेळीच जर तपासणी व उपचार नाही केले तर कायमस्वरूपी अंधत्व येते. त्यासाठी प्रत्येकाने दक्ष राहुन वेळोवेळीं तपासणी करणे गरजेचे आहे.या वेळी डॉ नवनाथ घुगे,कमल बरुरे,विवेक गंगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ स्नेहल पेस्टे यांनी केले. तर संचलन व उपस्थितांचे आभार प्रा.रोहिणी पाठक यांनी मानले. नेत्रतज्ञ डॉ स्नेहल पेस्टे यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी व उपचार केले. यावेळी  डॉ दामोदर थोरात, अरुण असरडोहकर, अनंत जगतकर, भागवत कांबळे, जगदीश जाजू, विश्वनाथ लहाने, अनिरुद्ध चौसाळकर ,पुरूषोत्तम रांदड, संतोष मोहिते, आनंद कर्नावट, कल्याण काळे, धनराज सोळंकी, प्रा, अजय पाठक, राजेश भिलावे , हर्षवर्धन वडमारे, सचिन गौरशेटे, उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा