Subscribe Us

header ads

राजस्थानी गणेश मंडळाच्या वतीने बीड येथील ‘आनंदवन’ आश्रमास जीवनावश्यक साहित्याचे वितरण

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- परळी येथील राजस्थानी गणेश मंडळाच्या वतीने बीड येथील ‘आनंदवन’ आश्रमास जीवनावश्यक साहित्याचे नुकतेच बीड येथे जावून वितरण करण्यात आले.सामाजिक जाणिवेतून वेगळे काही तरी करावे, आश्रमातील गरजु मुलांची थोडीफार का होईना गरज भागावी या उदात्त हेतूने परळी वैजनाथ येथील राजस्थानी गणेश मंडळाच्या वतीने जमलेल्या वर्गणीचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने बीड येथील आनंदवन आश्रमाला जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यात बारा खुर्च्या, तीन पाण्याचे जार, एक कटींग मशिन, कात्री, सिंगल फेस वायर बंडल, बारा बल्ब, दोन टेस्टर, पाना सेट, 12 प्लास्टिक बकेट, 12 मग असे साहित्याचे वितरण करण्यात आले.दरम्यान, बीड येथील दत्तात्रय बारगजे, संध्याताई बारगजे यांनी बीड शेजारी 10 किलोमीटर अंतरावर पाली गावाजवळ आनंदवन हे आश्रम चालवतात. ते 50 एड्सग्रस्त मुले, मुलींचा सांभाळ करतात. या मुलांना हक्कचं घर त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. या सर्व मुलांची आई-वडीलांप्रमाणे देखभाल करत असतात. त्यांच्या शिक्षणाची, विवाहाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याला आपला हातभार लागावा म्हणून राजस्थानी गणेश मंडळाच्या वतीने ही मदत करण्यात आली.यावेळी राजस्थानी गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन झंवर, सचिव राहुल भंडारी यांच्यासह महेश बजाज, हर्षल झंवर, गोपाल सोनी आदींनी या ठिकाणी जावून साहित्याचे वितरण केले. दरम्यान, हे साहित्य वाटप केल्याबद्दल दत्तात्रय बारगजे व संध्याताई बारगजे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा