Subscribe Us

header ads

स्वराज बाबर ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्कृष्ट मास्टर ऑफ अबॅकस .झाल्याबद्दल रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड कडुन सत्कार करण्यात आला

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे
♦♦♦♦♦♦♦

बीड (प्रतिनिधी) बालकांच्या बौद्धिक विकास करण्याच्या उद्देशाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. शहरातील अबॅकस स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप , अबॅकस असोसिएशन समन्वयाने 17 सप्टेंबर 2021 शुक्रवार रोजी संपन्न झाली असून या स्पर्धेमध्ये भारत देशातील सर्व राज्यांमधून एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला असून सदरील स्पर्धेत बीडच्या सुपर  25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट विजयी  मिळविले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अतिशय  प्रतिष्ठित समजले जाणारे सर्वोत्कृष्ट मास्टर अबॅकस स्वराज चंद्रकांत बाबर याने लेव्हल मधील फक्त तीनच मिनिटांमध्ये सर्व प्रश्न अचूक सोडविण्याचा ऐतिहासिक विक्रम त्याने केलेला आहे. स्वराज बाबरने मिळवलेल्या यशामध्ये त्याच्या आई आणि वडील यांचा सिंहाचा वाटा असून त्यांना सतत योग्य ते मार्गदर्शन तिच्या शिक्षकांनी केलेले आहे असे त्याने सांगितले आहे. रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य यांनी. अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.  नोव्हेंबर 2021 महिन्यामध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेकरीता स्वराज बाबरची निवड झालेली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा