Subscribe Us

header ads

थकीत वेतनासाठी नगरपालिके समोर महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले

बीड-ऑक्टोबर व नोव्हेंबर २०१९ चे थकीत वेतन तात्काळ अदा करावे या मागणीसाठी रोंजदारी मजदुर सेनेच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.८) नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात सुरू होते. यावेळी रोजंदारी मजदुर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी तीन महिलांनी वेतनासाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने खळबळ उडाली.यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना तात्काळ रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.  शुक्रवारी (दि.८) आंदोलन सुरू असतानाच दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्यापैकी तीन महिलांनी स्वतःजवळील बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहर पोलिसांनी वेळीच त्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. आमच्या कामाचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत आणि सीओ साहेब स्वतः आंदोलनस्थळी येत नाहीत तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी भूमिका महिला आंदोलकांनी घेतली होती. दरम्यान आज थकीत रोजंदारी न मिळाल्यास उद्या पालिकेला कुलूप ठोकण्याचा ईशारा महिला आंदोलकांनी दिला. आम्ही स्वतः कामे केली आहेत.गुत्तेदार कोण आहे माहित नाही मात्र आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळावा अशी मागणी रोजंदारी महिला आंदोलकांनी यावेळी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा