Subscribe Us

header ads

खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलासाठी लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन

बीड (प्रतिनिधी) - शहरातील खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलासाठी लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन करणार असल्याचे निवेदन आंदोलनकर्ते एस.एम.युसूफ़ आणि सय्यद इलयास यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकारी यांना दिले असून येत्या सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता नियोजित पुलाच्या जागी बिंदुसरा नदी मध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून बिंदुसरा नदीतून ये-जा करताना खासबाग-मोमीनपुरा या भागातील नागरिकांना  मोठ्या हालअपेष्टा सोसाव्या लागत आहे. पावसाळ्याच्या हंगामातील ४ महिने बिंदुसरा नदीतून सातत्याने पाणी वाहत असल्याने पादचारी जीवाची जोखीम घेत जवळपास कमरेइतक्या नदीच्या पाण्यातून ये-जा करतात तर सायकल स्वारांसह दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना बार्शी रोड किंवा जुना बाजार मार्गे लांब वळसा घालून ये-जा करावी लागते. ऐतिहासिक दगडी पुलावरून नदीचे पाणी वाहत असल्यास सुभाष रोड आंबेडकर चौक मार्गे अजून लांब वळसा घेऊन ये-जा करावी लागते. यामुळे नागरिकांना पावसाळ्याच्या हंगामातील ४ महिने मोठ्या हाल-अपेष्टा सोसाव्या लागतात तर उर्वरित ८ महिने खाचखडग्याच्या नदीपात्रातून ये-जा करावी लागते. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, शेतकरी, कष्टकरी, कामगार, भाजीपाला विक्रेते आणि इतर व्यवसाय करणाऱ्यांना शाळा, महाविद्यालय, दवाखाने, आडत मार्केट आणि आस्थापनांकरिता ये-जा करताना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. नागरिकांना होत असलेला त्रास बंद व्हावा म्हणून गेल्या पाच वर्षापासून आम्ही शासन-प्रशासनाकडे सातत्याने खासबाग-मोमीनपुरा जोडण्याकरिता बिंदुसरा नदीवरील नियोजित पुलाचे निर्माण लवकरात लवकर व्हायला हवे परंतु गेल्या पाच वर्षात या पुलाविषयी राजकीय पुढारी व नेतेमंडळी फक्त स्टंटबाजी करीत असून आतापर्यंतही या पुलाचे निर्माण कार्य सुरू करण्यात आले नाही. तसेच प्रशासनिक स्तरावर सुद्धा आतापर्यंत उदासीनताच दिसून आली आहे. यामुळे येत्या ११ ऑक्टोबर २०२१ सोमवार रोजी सकाळी ११:०० वाजता बिंदुसरा नदीत लक्षवेधी डुबकी लगाव आंदोलन करण्यात येणार असून यात सामाजिक कार्यकर्ते सुद्धा प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. असे आंदोलनकर्ते एस.एम.युसूफ़ आणि सय्यद इलयास यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा