Subscribe Us

header ads

विजेची तार अंगावर पडल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य एकजण गंभीररित्या जखमी

गेवराई_तलवडा येथे गोदावरी नदी पात्रात आंघोळीला जात असताना वीज पुरवठा करणारी विजेची तार अंगावर पडल्याने एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडापासून जवळच असलेल्या भोगलगाव येथे आज सकाळी धोंडीराम रामा कांबळे (वय ६५) हे आंघोळीला जात असताना लोंबकळत असलेले तार अचानक त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये जबरदस्त शॉक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबतचे राणोजी यशवंत खरात हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात  तलवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पो. नि. प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राठोड पुढील तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा