Subscribe Us

header ads

बीड मधील बार्शी रोड, नगर रोड, झाला मृत्युचा सापळा.! सर्वत्र खड्डे आणी‌ धुळीने शहरातील नागरिकांंत होतोय प्रचंड संताप. आमदार साहेब लक्ष घाला!

बीड प्रतिनिधी / दि.०६ बीड बार्शी रोड व नगर रोड झाला मृत्युचा सापळा .बीड शहरातील बार्शी कडे जाणारा रस्ता पूर्ण पणे खराब झाला आहे. खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत. तसेच बीड शहरातील नगर रोड, व बार्शी रोड वरील धूळीने नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या सर्व गोष्टीला जनता कंटाळली आहे, रोजचा प्रवास आणि खराब रस्ता हा धोके - दायक दिसत असल्याने नागरिकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मुळे शहरातील नागरिक खुप परेशान झाले आहेत.

प्रशासनाचे व नेत्यांचे या रस्त्याकडे का दुर्लक्ष होत आहे.? असे अनेक प्रशन जनतेतुन बोलले जात आहे. बीडला जाणे म्हणजे जिवावर उदार होऊन जावे लागत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर उपाय योजना कराव्यात. 

असाच एक ॲक्सिडंट बीड येथील बार्शी रोड वरती राष्ट्रवादी भवन समोरील रोडवर असलेले खड्डे, आणि अति प्रमाणात अतिवृष्टी मुळे रिक्षाा चालकाला खड्ड्यांचा अंदाजा न आल्यामुळे ॲटो रिक्षाचा अपघात झाला आहे.

रिक्षा चालकाला याच खड्ड्यांचा अंदाजा न आल्यामुळे रिक्षा जोरात आदळला गेला. व रिक्षात प्रवास करणारे धांडे नगर येथील रहिवासी आपल्या बीड शहरातील नागरीक असून श्री. रमेश जाधव यांना रिक्षातून पडून डोक्याला खूप मोठी जखम झाली आहे. त्याच रिक्षाचालकाने त्यांना रात्री अकरा वाजता बीड जिल्हा येथील शासकीय रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी तात्पुरती पट्टी बांधून घरी पाठवले. असे कितीतरी अपघात बीड शहरात घडतात. तरीही बीड जिल्ह्याचे राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी हे बीड शहराच्या रस्त्याकडे कधी लक्ष देणार ? नगर रोड वरती असंख्य खड्डे पडलेले फोटो व बातम्या व्हायरल झालेल्या तरीही जनतेचा कळवळा प्रशासनाला व कुठल्याही पुढाऱ्यांना आलेला नाही. बीड जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने नाल्या गच्च भरून पाणी रोडवर वाहताना दिसतच आहे.

व त्यातून लोकांना या खड्डेमय रस्त्यातून जीव मुठीत धरून रोज प्रवास करवा लागत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा