Subscribe Us

header ads

अतिवृष्टीच्या 502 कोटी रुपये मदतीतील डिसीसी बँकेमार्फत 30 कोटींचे वितरण; डिसीसी मार्फत वितरण प्रक्रिया सुरू पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेप्रमाणे डिसीसीने थेट खात्यात पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया केली तातडीने सुरू

बीड स्पीड न्यूज 

बीड (दि.02) ---- : बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना प्राथमिक दिलासा म्हणून मिळालेल्या 502 कोटी रुपये मदती पैकी तीस कोटी रुपये वितरण करण्याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे असून जिल्हा मध्यवर्ती बँकेने रोख रक्कम उपलब्ध करून संबंधित शेतकऱ्यांच्या या खात्यावर वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. डिसीसी बँकेकडे जबाबदारी असलेले 30 कोटी रुपये वितरणासाठी डिसीसी बँकेने विशेष विनंती करून स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र कडून सदर रक्कम तातडीने वर्ग करून उपलब्ध करून घेतली आहे. या रक्कमा येत्या दोन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील व शेतकऱ्यांना एटीएम द्वारे हे पैसे आहरण करता येतील अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अविनाश पाठक यांनी दिली आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे हे मदतीच्या रक्कम वितरणाचा दैनंदिन आढावा घेत असून प्रशासनाला गतिमान प्रक्रिया राबविण्याबाबत वेळोवेळी सूचना देत आहेत. त्यामुळे 502 कोटींपैकी जास्तीत जास्त रक्कम दिवळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा