Subscribe Us

header ads

बीड पालिकेच्या लेखा परीक्षण अहवालात गंभीर स्वरूपाची अनियमितता उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांनी नगराध्यक्षांसह प्रशासनाला धरले धारेवर भ्रष्टाचार दडपण्यासाठी घाई गडबडीत गुंडाळली सभा,

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- बीड नगर परिषदेचे सन 2017-18 चा लेखा परीक्षण अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आला. या लेखा परीक्षण अहवालामध्ये गंभीर स्वरूपाची अनियमितता, गैरव्यवहार व अक्षेप नोंदवलेलेल असतांना नगराध्यक्ष व पालिका प्रशासन भ्रष्टाचार दडपण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणुन देत अनियमितते बाबत उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने समर्थन करणार्‍या नगराध्यक्ष व नगरसेवकांवरही जबाबदारी निशचित करण्याची मागणी करताच पालिकेची सर्वसाधारण सभा घाई गडबडीत गुंडाळण्यात आली आहे.

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अन्वये परिशिष्टात नमुद केलेल्या कामकाजासाठी बीड नगर पालिकेची सर्वसाधारण सभा दि.3 नोव्हेंबर 2021 रोजी बोलवण्यात आली होती. या सभेच्या नोटीसमध्ये मुद्दा क्र.14 बीड नगर परिषद सन 2017-18 चे लेखा परीक्षण बाबतचा अहवाल माहितीस्तव या संदर्भात आर्थिक अनियमितता, गंभीर स्वरूपाचे परीक्षण यावर नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाला उपनगराध्यक्षांनी चांगलेच धारेवर धरले. या विरूद्ध अक्षेपही नोंदवला. यावेळी नगरसेवक रमेश चव्हाण, नगरसेवक जैतुल्ला खान, नगरसेवक लक्ष्मण ईटकर, नगरसेवक सम्राट चव्हाण, नगरसेविका वैशाली विशाल घाडगे, नगरसेविका मिना बिभीषण लांडगे, नगरसेविका मोहम्मद फरजाना बेगम, नगरसेविका मोमीन खमरूनिसा बेगम यांनी आक्षेपाला अनुमोदन दिले. तर बाकीच्या सर्व नगरसेवकांनी अहवालाचे समर्थन केले. वास्तविक पाहता या लेखा परीक्षण अहवालात गंभीर निरीक्षण आढळून आलेले असतांना असे समर्थन करणे चुकीचे आहे. कलम 9 अ,ब,क प्रमाणे बँक खात्यात रक्कम शिल्लक नसतांना धनादेश देण्यात आले, एका निधीतून रक्कमा दुसर्‍या निधीत वर्ग करणे, वीज बील देयकांच्या अदाईबाबत अनियमितता, दैनंदीन वसुलीच्या रक्कमा बँकेत न भरता परस्पर वटवणे, कर्मचार्‍यांचे एलआयसीचे पैसे पगारातून कपात करण्यात आले परंतू एलआयसीला मिळालेले नसणे असे गंभीर स्वरूपाचे आरोप असतांना नगराध्यक्ष व ज्या-ज्या नगरसेवकांनी या ठरावाला समर्थन करून कायद्यामध्ये कसूर करण्याचे काम केले अशावर कायदेशीर जबाबदारी  निशचित मागणीही करण्यात आली आहे.

सफाई कामगारांच्या प्रश्नावर नगराध्यक्ष निरूत्तर
!


बीड न.प.कामगारांना लाड कमिटी व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार अनुकंपा लागु करून नियुक्ती करणे बाबतचा विषय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. वास्तविक पाहता नगर परिषदेचा मुद्दा क्र.3 मध्ये एक हा विषय चुकीचा असल्याचे उनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिले. याचे कारण की, अनुकंपानुसार लाभ देणे 2016 पासून सुरू आहे तर पागे व लाड कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना लाभ देण्या बाबतची कार्यवाही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नानंतर नगर विकास विभागाकडून अंतिम टप्प्यात आहे. केवळ बीड नव्हे तर महाराष्ट्रातील विविध विभागातील सफाई कामगारांना याचा फायदा होणार आहे असे सांगत हेमंत क्षीरसागर यांनी बीड शहरातील स्वच्छता कामगार, सफाई कामगार यांच्या प्रश्नाबाबत प्रश्न विचारल्यानंतर बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष निरूत्तर झाले. हा अनुभव सभागृहाने घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा