Subscribe Us

header ads

प्रशासनाला जागे करण्यासाठी करण्यात आलेल्या लक्षवेधी निषेध आंदोलनात आंदोलन कर्त्यांसमोर ओशाळली माकडाची प्रतिकृती

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) - नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला जागे करण्यासाठी करण्यात आलेल्या लक्षवेधी निषेध आंदोलनात आंदोलनकर्त्यांसमोर माकडाची प्रतिकृती ओशाळल्याने मोठी चर्चा होत आहे.
याविषयी सविस्तर असे की, महात्मा गांधींचे बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो चे विचार दर्शविणाऱ्या जिल्हा कारागृह मागील माने कॉम्प्लेक्स समोरच्या टी पॉइंटवर शहराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली बसविलेल्या तीन माकडांच्या प्रतिकृती पैकी बुरा मत देखो या प्रतिकृतीची अज्ञात माथेफिरू कडून करण्यात आलेल्या तोडफोडीवर दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनासह बीड नगर परिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला ही निवेदने देऊन संबंधित माथेफिरु चा माग काढून शासन करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आलेली आहे परंतु यापैकी कोणत्याही प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याने याचा निषेध म्हणून मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, इंजि. मुहम्मद मोईज़ोद्दीन, सय्यद जावेद सर, शेख युनूस चर्‍हाटकर, शेख मोबीन, संदीप जाधव, शेख जाहेद भाई आदींनी घटनास्थळी काळ्याफिती लावून लक्षवेधी निषेध आंदोलन केले.
यावेळी एस.एम.युसूफ़ म्हणाले की, येथे तोडफोड करण्यात आलेल्या माकडाच्या प्रतिकृती वर हा हल्ला नसून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारावर हल्ला आहे. मात्र याचे गांभीर्य बीड नगर परिषदेतील पुतळे उभारू सत्ताधाऱ्यांना तर नाहीच परंतु प्रशासनाला सुद्धा नाही हे पाहून वैषम्य वाटते.
डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली मनाला येईल तिथे पुतळे उभारून त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी करायची नंतर त्याच्या देखरेखी च्या नावाखाली स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये लाटायचे हा बीड नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांचा धंदा झाला आहे. ते यातून  दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून माया गिळंकृत करत आहेत. परंतु पुतळ्यांच्या सुरक्षिततेचे काय ? असा सवाल उपस्थित केला.

आंदोलनावेळी ओशाळली प्रतिकृती !
बुरा मत देखो हा संदेश देणारी माकडाची प्रतिकृती माथेफिरूने तोडल्यानंतर त्यावर प्रसिद्धी माध्यमातून वाचा फोडल्यावर काही दिवसांनी परत त्याच जागी तुटलेले अवशेष आणून ठेवण्यात आले आहे. आज घटनास्थळी जेव्हा आंदोलनकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली तेव्हा वाऱ्याचा एक मोठा झोका आला तेव्हा तुटलेली ही प्रतिकृती वट्ट्यावर पडली. हे दृश्य पाहून येथे उपस्थित असलेले नागरिक म्हणाले बीड नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करणाऱ्या जागरूक आंदोलनकर्त्यांसमोर प्रतिकृतीही ओशाळली.

दोन मिनिट मौन पाळत स्तब्ध उभे राहून व्यक्त केली खिन्नता !
आंदोलनाच्या शेवटी आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्याकरिता दोन मिनिटे मौन धरत स्तब्ध उभे राहून खिन्नता व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा