Subscribe Us

header ads

निवडणूकीत दिलेल्या शब्दांची विकास कामांच्या माध्यमातून पुर्तता -आ.संदिप भैय्या क्षीरसागर बीड शहरातील प्रसिद्ध पापनेश्वर मंदिर येथे सभा मंडपाचे भूमिपुजन; सौर पथ दिव्याचे लोकार्पण

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- मागील काळात अनेक ठिकाणी विकास कामे करण्याचे दिलेले शब्द आज विकास कामे प्रत्यक्ष सुरू करून पुर्ण होत असतांना याचा मनापासून आनंद वाटतो. पुरोगामी विचार घेवून सर्वांना सोबत घेवून गेल्या पंचवीस वर्षात जो विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. 1960 पासून पापनेश्वर मंदिरा संदर्भातील वाद मिटला. मुस्लिम समाजाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही आभार. मंदिर परिसराच्या विकासासाठी कुठेच कमी पडणार नाही, मोठ्या प्रमाणात निधी देईल, कामेही गुणवत्ता व दर्जेदार करून घेवू असे प्रतिपादन आ.संदिप भैय्या 

क्षीरसागर यांनी केले. बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील प्रसिद्ध पापनेश्वर मंदिरासमोरील 9 लक्ष रूपयांच्या सभामंडपाचे भूमिपुजन व दोन लक्ष रूपयांच्या पथदिव्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.सोमवार दि.8 नोव्हेंबर 2021 रोजी बीड शहरातील तेलगाव नाका परिसरातील प्रसिद्ध पापनेश्वर मंदिरासमोर आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या स्थानिक निधीमधून 9 लक्ष रूपयांच्या सभा मंडपचे भूमिपुजन व 2 लक्ष रूपयांच्या सौर पथ दिव्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेठ बीडचे नेते, बहिरवाडीचे माजी सरपंच आसाराम भाऊ गायकवाड हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांची उपस्थिती 

होती. यावेळी बोलतांना आ.संदिप भैय्या म्हणाले की, बीड नगर पालिका विकास कामात अडथळा आणत असून एनओसी सुद्धा देत नाही. परंतू आपण विकास कामात कोठेच कमी पडणार नाही. कोरोना काळातही शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. सार्वजनिक हिताची कामे प्राधान्याने करून घेणार. त्याची गुणवत्ता आणि दर्जा टिकला पाहिजे यासाठीही कडक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. येणार्‍या निवडणूकीत आपल्यासमोर कोणीच विरोधक नाही, त्यामुळे त्यांचे नावही कोणी घेत नाही. परंतू आशा लोकांना आता जनतेने ओळखून घरी बसवलं पाहिजे. विकासाची जबाबदारी आता आम्ही उचलली आहे ती पूर्ण करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तर माजी आ.सय्यद सलीम म्हणाले की, विकास कामे करण्याचा विडा आ.संदिप भैय्यांनी उचलला आहे. त्यामुळे आपण आपले आशिर्वाद आ.संदिप भैय्यांच्या पाठिशी उभे करो असे आवाहनही त्यांनी यावेळी केलेे. 

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना आसाराम भाऊ गायकवाड म्हणाले की, या भागाचा विकास झालेला नाही. पापनेश्वराच्या कृपेने जनतेच्या आशिर्वादाने भैय्या आमदार झाले. आता या मंदिराच्या आणि या भागाच्या विकासासाठी झुकतं माप द्या असं सांगत सभागृह व इतर विकास कामे मंजुर केल्याबद्दल आ.भैय्यांचे त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ढाका सर यांनी करत या भागातील विविध प्रश्नावर प्रकाशही त्यांनी टाकला. यावेळी मान्यवरांचे स्वागत नगरसेवक लक्ष्मण ईटकर, सुनिल महाकुंडे, संतोष घुमरे, राजकुमार ढोले, अतुल शेवाळे, ॠषिकेश ढोले, गंगाराम बोबडे, संतोष जाधव, राहुल ढोले, उमेश नाना, विपुल गायकवाड, अशोक शिंदे, सुशिल जाधव, राजाभाऊ दुधाळ, पोपट घाडगे, राहुल महाकुंडे, आकाश गायकवाड, अमोल जाधव, राम गायकवाड आदींनी केले. तर यावेळी पापनेश्वर देवस्थान ट्रस्टचे भरत झांबरे पाटील, वांगीकर, वाघमारे आदींची विशेष उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पापनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने व या भागातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

दिशाभूल करणार्‍यांपासून सावध रहा- अ‍ॅड.डी.बी.बागल

आ.संदिप भैय्या लोकप्रिय आमदार असून त्यांची लोकप्रियता जनमाणसांनी मान्य केली आहे. विरोधक स्वत:च लोकप्रिय म्हणून घेतात आणि निवडणूकीत पराभूत होतात ही कसली त्यांची लोकप्रियता? केवळ भुलथापा द्यायच्या, दिशाभूल करायची आणि जनमाणसात संभ्रम निर्माण करायचा अशा लोकांपासून आता सावध रहावं. त्यांना येणार्‍या निवडणूकीत त्यांची जागा दाखवून द्यावी असे सांगत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल यांनी बीड शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास आ.संदिप भैय्या करत आहेत. नेटाने काम करत असतांना त्यांना भविष्य उज्ज्वल आहे, जनतेने आशिर्वाद द्यावेत असे आवाहनही त्यांनी केले.

खोट बोल पण रेटून बोलणार्‍यांना कायमचं घरी बसवा-माजी आ.सुनिल धांडे

ज्या ठिकाणी 5 हजार लोक बसण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी म्हणे 25 हजार लोक आले असे सांगणार्‍यांनी जनाची नाही मनाची तरी थोडी बाळगावी पण खोट बोल पण रेटून बोल अशी भूमिका अवलंबवणार्‍यांना जनतेने कायमच घरी बसवावं असा टोला माजी आ.सुनिल धांडे यांनी बीडचे नगराध्यक्ष व माजी मंत्री यांना लगावला आहे. पापनेश्वरचा वाद मिटवणं सोपी गोष्ट नाही परंतू आ.संदिप भैय्यांनी सर्वांना सोबत घेवून वाद मिटवून सभागृहाचे भूमिपुजन केले. या भागाचा विकास आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून होत आहे. जनतेने आणि पापनेश्वरांच्या भक्तांनी आपले आशिर्वाद संदिप भैय्यांच्या पाठिशी उभे करावे असे आवाहनही त्यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा