Subscribe Us

header ads

जुना मोडा भागात बीड नगरपालिकेच्या स्वच्छतेचा व विकास कामांचा आम आदमी पार्टीने कामाचा फज्जा उडवला ; माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमि पार्टी

बीड स्पीड न्यूज 

बीड_ बीड शहरामध्ये असलेला जुना मोंढा भागामध्ये आज आम आदमी पार्टीच्या वतीने चालू असलेल्या स्वच्छता मोहीम व संवाद मोहिमेत या भागांमध्ये फक्त आणि फक्त नगरपालिका विकासाच्या नावावर गाजर दाखवण्याचं काम करत आहे या भागामध्ये शहरातीलच नव्हे तर बीड जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी आपला  किराणा सामान शेतीचे अवजारे बी बियाणे घेण्यासाठी येतात या भागांमध्ये कोठेही रस्ता ठिक नाही मोठमोठे पडलेले खड्डे त्यामध्ये विकासाच्या नावावर नगरपालिकेकडून फक्त टाकलेला मुरूम दिसत आहे खेडेगावातून मोठ्या प्रमाणात नागरिक हमाल व्यापारी येथे येत आहेत परंतु या भागांमध्ये एकही नगरपालिकेचे स्वच्छालय दिसून आले नाही एका ठिकाणी फक्त एक मुतारी बांधण्याचं काम नगरपालिकेने केलेला आहे परंतु त्या मुतारी ला जाण्यासाठी कोठेही रस्ता नाही पाण्याची 

व्यवस्था नाही बीड नगरपालिका येथील नागरिकांना व्यापाऱ्यांना फक्त वेठीस धरण्याचे काम करत आहे कुठेही नाली नसल्यामुळे तेथे नाल्यावर अतिक्रमण नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे झालेले आहे मोठे संकुलन बांधण्यात आलेले आहे त्या संकुलांना च्या समोर असेल किंवा संपूर्ण मोड्यांमध्ये कधीही नालीचे स्वच्छतेचे काम झालेलं नाही कधीकाळी डांबर चे रोड झाले त्या रोडचा कधीही मेंटेनन्स झालं नाही या सर्व गोष्टी आम आदमी पार्टी जनतेच्या समोर आणण्याचं काम करत आहे सर्व नागरिक नगरपालिके विषयी नाराजी व्यक्त करत आहेत व येणाऱ्या काळामध्ये व्यापाऱ्यांना व नागरिकांनी भरलेल्या टॅक्स चा हिशोब विचारल्याशिवाय राहणार नाही या मोहिमेच्या वेळेस माजी सैनिक अशोक येडे, शहर प्रमुख सय्यद सादेक, संघटन मंत्री प्रा. ज्ञानेश्वर राऊत, सचिव रामधन जमाले, मीडिया प्रमुख रामभाऊ शेरकर, युवा कार्यकर्ते बाळासाहेब घुमरे, अभिषेक टाळके इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा