Subscribe Us

header ads

बीड स्पीड च्या दणक्याने खांडे पारगाव रस्त्याचे काम सुरू

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_खंडेश्वरी ते खांडे पारगाव हा रस्ता खुप खराब झाला होता. रस्त्याचे खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावरती अपघातात अनेक लोकांना शारीरिक इजा झाले होते. अनेक अपघात घडले होते. या परिसरातील नागरिकांची इच्छा होती. की लवकरात लवकर हा रस्त्यांचा विषय मार्गी लागावा अशी या 

भागातील नागरिकांची मागणी होती. या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम होत नव्हते या रस्त्याने अनेक गावाची रहदारी असुन देखील प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते या परिसरातील नागरिकांची मागणी ऐकून बीड स्पीड ने ९ नोव्हेंबर रोजी या रस्त्याची दुरवस्था पाहून आपली बातमी 

प्रसिद्ध केली होती. बीड स्पीड ने बातमी प्रसिद्ध केल्या नंतर लगेच प्रशासनाने दखल घेत या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरु केले खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांत खुशीचे वातावरण आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा