Subscribe Us

header ads

वेतनासाठी दुसऱ्या दिवशीही उपोषण; माजलगाव नगर परिषद : चार आंदोलन करूनही न्याय मिळेना

बीड स्पीड न्यूज 

माजलगाव.प्रतिनिधी, येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात रोजंदारीवर सफाई कामगार म्हणून कामावर असलेल्या १८ महिलांचे ४ महिन्यांचे वेतन थकीत असल्याने ते देण्यात यावे म्हणून १६ नोव्हेंबर सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.या कामगारांनी यापूर्वी चार वेळा आंदोलने केली होती. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी केवळ तॉडी, लेखी आश्वासने दिली होती. पण, ऐन दिवाळी सणानिमित्ताने काहीच वेतन दिले नाही. शेवटी २९ ऑक्टोबरला निवेदन देण्यात आले होते. थकीत वेतन दिले नाही.त्यामुळे ८ नोव्हेंबरला धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. यावर नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी .आश्वासन दिले होते. दोनच दिवसांत वेतन दिले जाईल; पण त्याची पूर्तता केलीच नसल्याने १६ नोव्हेंबरला धरणे. आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवस झाले तरीही कोणीच दखल घेतली नाही.तरी नगरपरिषद प्रशासन ने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली,रेखाबाई सोनवणे यांच्या नेतृवाखाली केलेल्या धरणे आंदोलनात हौसाबार्ड डोंगरे, लक्ष्मीबाई सुतार, कमल शेळके, शाहूबाई टाकणखार, बबिता टाकणखार, सुनंदा सोनवणे, शाहूबाई सोनपसारे, कुसुम टाकणरवार, संजीवनी भालेराव, बबिता पौळ, सुरेखा वाघमारे, मंगल धाईजे, चंद्रकला शिनगारे, राधाबाई जाधव, संगीता साळवे, ज्योती कांबळे, मुद्रुका पाटोळे या महिलांसह चेतन प्रधान या पुरुष सफाई कामगाराचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा