Subscribe Us

header ads

बालविवाह रोखण्यापेक्षा बालविवाह होणारचं नाहीत असे वातावरण निर्माण करण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी :- सामाजिक कार्यकर्ते श्री बाजीराव ढाकणे

बीड स्पीड न्यूज 

बालविवाह प्रतिबंधक कायदा अंमलबजावणी प्रशिक्षण केज येथे संपन्न   


केज प्रतिनिधी _  केज येथे आयोजित बालविवाह प्रतिबंधक कायदा अंमलबजावणी प्रशिक्षण शिबिरांमध्ये अंगणवाडी सेविका, ग्रामविकास अधिकारी,  पोलिस यांची जबाबदारी ग्राम बाल संरक्षण समिती स्थापना व सक्षमीकरण व बालविवाह कायदेविषयक जनजागरण शिबीर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे मा. श्रीमती लटपटे मॅडम , श्री लहु राऊत संरक्षण अधिकारी, मा.श्री बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक लेक लाडकी अभियान ,श्री जहागिरदार विस्तार अधिकारी, श्रीमती के.यु. आडमुठे, श्रीमती एस.के.सुर्यवंशी, श्रीमती पी.जे. मुंडे ,ए.व्ही.डवरी, एम.एस.गित्ते,के.एम.तरकसे एस.बी.वाघमारे अंगणवाडी सुपरवायझर तसेच केज तालुक्‍यातील अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत पार पडले.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, प्रास्ताविके मध्ये कार्यक्रमाची रूपरेषा, उद्दिष्ट आणि ध्येय याबाबत सविस्तर माहिती  बालविकास अधिकारी श्रीमती लटपटे मॅडम यांनी देऊन प्रशिक्षण शिबिराचा हेतू  प्रशिक्षणार्थी समोर ठेवला. श्री बाजीराव ढाकणे बीड जिल्हा समन्वयक, लेक लाडकी अभियान यांनी ग्राम बाल संरक्षण समिती रचना व समितीचे कार्ये कर्तव्य व 

जबाबदारी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच बालविवाह होण्याची कारणे व ते थांबण्याविषयीची कोणाकोणाची काय काय जबाबदारी आहे या विषयावर चर्चा केली, यावेळी पुढे बोलताना बाजीराव ढाकणे यांनी सांगितले की आपल्या गावात व परिसरात बालविवाह रोखण्याची वेळ येण्यापेक्षा बालविवाह होणारचं नाहीत असे वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून असे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत या विषयावर गावागावांत चर्चा सुरू झाल्या तर नक्कीच बालविवाह होणारचं नाहीत.पण यासाठी गावांतील प्रत्येक नागरिकाला सजगपणे वावरावं लागेल आणि या आपल्या सजगते मुळेच जर एवढी मोठी समस्या नष्ट होणार असेल तर प्रत्येक नागरिकांनी हि जबाबदारी अंगिकारलीच पाहिजे असे प्रतिपादन केले.

लहु राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अधिकचे काम का करावे ? काम करताना ते मनातून केले तर त्याची यशस्विता पटकन मिळते. बालविवाह होण्याची कारणे कोणती आहेत. हे काम करताना निर्माण होणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या ? काम आनंदाने कसे करावे? यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच काम करताना कान व डोळे उघडे ठेवून ते करा आणि मानवी संवेदना जाग्या ठेवून येणाऱ्या काळात आपल्याला कार्य करावे लागेल. योग्य वयात योग्य जाणीवा मुलांना निर्माण करून द्या. पब्लिक सायकॉलॉजी ओळखा आणि कार्य करा यश आपलंच असणार आहे. बालविवाह कसे थांबवावेत याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
बाल विवाह कसे चुकीचे आहेत, त्यामुळे एका मुलीच्या आयुष्याबरोबर पुढच्या पिढीच ही  आपण नुकसान करत आहोत याबाबत व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले. ही माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलीच पाहिजे तुम्ही सर्वजण म्हणजे गावाचे पर्यायाने देशाचे पायाभूत घटक आहात म्हणूनच या कार्यासाठी तुमची निवड झालेली आहे आणि तुम्ही हे काम उत्कृष्टपणे कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. असे हि सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी म्हटले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून अनेक प्रेरणादायी विचार प्रभावीपणे ऐकणाऱ्या च्या काळजात रूजवत सकारात्मक विचारांची ऊर्जा सर्वांना देत सर्व शिबिरार्थ्यांच्या मनात नवा उत्साह निर्माण करत हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सुंदर प्रयत्न विस्तार अधिकारी जहागिरदार यांनी केला तसेच आभार प्रदर्शन हि केले.


 18 वर्षापेक्षा कमी वयात विवाह केल्यामुळे मुलींचे मानसिक व शारिरीक प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याबाबत वैद्यकीय निरीक्षणानुसार सिध्द झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोणत्याही आई वडिलांनी आपल्या मुला-मुलींचा विवाह मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21वर्षे पुर्ण झाल्याशिवाय करू नये.असा बालविवाह कोणी केल्याचं सिध्द झाले तर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कडक कार्यवाहीस सामोरे जावे लागेल


       श्री बाजीराव ढाकणे

सामाजिक कार्यकर्ता तथा बीड जिल्हा समन्वयक,लेक लाडकी अभियान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा