Subscribe Us

header ads

सत्यभामा मोरे यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 

बीड दि.17(प्रतिनिधी): बीड शहरातील बालेपीर भागातील पोलीस पेट्रोल पंपाच्या पाठीमागे रहिवासी असणाऱ्या सत्यभामा मुगाजी मोरे यांचे बुधवार दि 17 रोजी संध्याकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास वृध्दपकाळाने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय 96 वर्षे होते. आज सकाळी बार्शी रोडवरील भगवान बाबा प्रतिष्ठानच्या मागे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.सत्यभामा मोरे यांचा स्वभाव अतिशय शांत आणि संयमी होता. त्या मोठ्या धार्मिक वृत्तीच्या असल्याने त्यांची  परिसरात चांगली ओळख  होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बालेपिर भागात शोककळा पसरली.  त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, एक सून, दोन नातू, तीन नाती, पणतू असा मोठा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जाधव यांच्या आजी होत्या. मोरे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक