Subscribe Us

header ads

राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी सुरेश पवार यांची निवड

बीड स्पीड न्यूज 

बीड,दि.15 (प्रतिनिधी)ः- रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा म्हणून कायम रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र उभा राहून सर्वसामान्यांची सेवा करत समाज सेवा करणार्‍या कोरोना योद्धा तसेच रुग्णसेवक सुरेश पवार यांच्या कार्याची दखल घेत संस्थापक अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांच्या आदेशावरून राष्ट्रीय महासचिव प्रा. पी.टी.चव्हाण सर यांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी सुरेश पवार यांची नियुक्ती पत्र देवून निवड करण्यात आली.गेल्या अनेक वर्षापासून करत असलेल्या समाजसेवा व रुग्णसेवची पावती राष्ट्रीय बंजारा  परिषदेने जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सुरेश पवारांच्या हाती देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांचा टाकलेली जेमेदारी, विश्वास आणि पदाचा अहोरात्र समाजसेवेसाठी कायम काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महासचिव तथा मा.जि.प.सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांच्या हस्ते सेवागड निवास्थानी नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष जीवन राठोड, प्रदेश प्रवक्ते अमोल पवार, मराठवाडा नेते रमेश पवार, जिल्हाउपाध्यक्ष बाजीराव राठोड, कृष्णा राठोड, संजय चव्हाण, पवन जाधव, अमर राठोड, एकनाथ आडे, ज्ञानेश्‍वर पवार, वसंत आडे, मानिक महाराज, गोविंद महाराज, अनिल महाराज, सुंदरसिंग महाराज, प्रकाश राठोड, अर्जुन जाधव, पवन चव्हाण, अनिल जाधव, कैलास राठोड, बाळू राठोड आदींनी नुतन जिल्हाध्यक्षाचे अभिनंदन करण्यात आले. तसेच संघटनेला नवतरूण जिल्हाध्यक्ष मिळाल्याने संघटना वाढीविण्याचे काम जोमात चालणार असल्याचे समाजाच्या विविध घटनातून मत व्यक्त केले जात आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा