Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यात शांतता राखणे हाच महत्त्वाचा उद्देश -- जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


बीड, दि. १५ ::--जिल्ह्यात सामाजिक शांतता बिघडवणार्या घटनांचा परिणाम होऊ नये व जिल्ह्यातील शांतता कायम राहावी यासाठी जिल्हास्तरीय बैठकीचा आयोजन करण्यात आले असून व बीड जिल्ह्यात शांतता राखणे हाच महत्त्वाचा उद्देश आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री शर्मा बोलत होते. बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. आर राजा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पोलीस अधिकारी, महावितरण सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच बैठकीसाठी शांतता समितीचे सदस्य, विविध 

धर्मांचे प्रतिनिधी, धर्मगुरू व पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी इतर ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा परिणाम जिल्ह्यातील परिस्थितीवर होऊ नये यासाठी सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. वैयक्तिक अडचणी व तक्रारी असतील त्या थेट प्रशासनाकडे मांडता येतील. इतर राज्यात घडणार्‍या घटनांचा परिणामामुळे आपल्या जिल्ह्यातील नागरिकांचे नुकसान होऊ नये असे जिल्हाधिकारी श्री शर्मा म्हणाले.बैठकीत सुरुवातीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्री .आर. राजा यांनी प्रस्तावित करून जिल्ह्यात शांतता राखणेसाठी सर्व नागरिकांनी प्रशासनला सहकार्य करण्याचे आवाहन केले,  त्रिपुरा येथील घटना आणि इतर काही विषयांचा परिणाम होऊन देशात व राज्यातील काही ठिकाणी सामाजिक शांतता व सलोखा बिघडत आहे. आपल्या जिल्ह्यात व शहरातील शांतता रहावी यासाठी नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न या 

बैठकीतून करण्यात येत आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राजा म्हणाले या नंतर विविध प्रतिनिधींनी आपल्या भावना व मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी समाज शांतता बिघडवणाऱ्या बाबींना प्रतिबंध करण्याची मागणी मांडून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनास पूर्ण सहकार्य करण्यात येईल अशा भावना विविध प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. यावेळी ॲड.महेश धांडे, मुक्ती अब्दुल्ला कासमी, अनंत देवा जोशी, फारुक पटेल यासह विविध जणांनी भावना व्यक्त केल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा