Subscribe Us

header ads

माजलगाव नगरपरिषद चा भोंगळ कारभार आंधळं दळतय अन कूञ पिठ खातय अशी वेळ आली नगरपरिषद वर

बीड स्पीड न्यूज 

माजलगांव प्रतिनिधी_ माजलगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक १४/०९/२०२१ रोजी दाखवण्यात आलेली सभा रद्द करून त्या संदर्भाने मा. जिल्हाधिकारी यांनी देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व देण्यात येणाऱ्या प्रशासकीय मान्यता रद्द करणे ,वरील संदर्भाचे पत्र पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष नगर परिषद माजलगांव यांना माजलगांव न.प.चे मुख्याधिकारी श्री. विशाल भोसले यांनी दिनांक ३०/०७/२०२१ रोजी जा.क्रं. १९५२/२०२१ अन्वये दिलेले असतांना आणि मा. मुख्याधिकारी सभेला अनुउपस्थित असतांना ते उपस्थित असल्याचा इतिवृत्तामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तरी खोटी माहिती व शासन नियमाचा व संदर्भीय शासन आदेशाचा भंग करून पिठासीन अधिकारी तथा नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी सदस्यांना विचारात न घेता गैरमार्गाने व सन्माननीय सदस्याची फसवणुक करुन दिनांक १४/०९/२०२१ ची सभा दाखवली आहे. तरी दि. १४/०९/२०२१ रोजीच्या दाखवण्यात आलेल्या सभेतील सर्व विषय हे शहर विकासासाठी आलेला निधी शहराच्या काही विशिष्ट भागात करोडो रुपयांचा निधी टाकुन काही प्रभागांना डावलुन शहराचा असमतोल विकास कामे असणारा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून निधी हडप करण्याचा डाव असल्याचे दिसुन येत आहे. तरी संदर्भीय शासन आदेशान्वये ऑफलाईन सर्वसाधारण सभा घेता येत नाही. त्यामुळे दिनांक १४/०९/२०२१ रोजीची सर्वसाधारण सभा ही गैरमार्गाने व शासनाच्या आदेशाचे भंग करणारी ठरते. तसेच नगरसेवकांच्या अधिकारांचा हनन करणारी ठरत आहे. त्या सभेत घेण्यात आलेले सर्व विषयाचे ठराव रद्द करून व त्या ठरावाच्या संदर्भाने आपणाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आलेले बोगस प्रस्ताव व दि. १४/०९/२०२१ च्या मिटींगच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता रद्द कराव्यात.तरी दि. १४/०९/२०२१ रोजी दाखविण्यात आलेली बोगस सर्वसाधारण सभेची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी  मागणी नगरसेवक च्या वितिने करण्यात आली,अशोकराव आळणे,सभापती नियोजन, न.प.माजलागांव.शंभर सिमा नारायण होके,सदस्या, न.प.माजलगांव, राज सय्यद अहेमद नुर ,सदस्य, न.प.माजलगांव ,सौ. स्वाती सचिन डोंगरे सदस्या, न.प.माजलगांव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा