Subscribe Us

header ads

अतिवृष्टीच्या अनुदानासाठी रास्ता रोकोचा इशारा सरपंच परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

बीड स्पीड न्यूज 

बीड_ मांजरसुंबा महसुल मंडळातील शेतकर्यांना अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही मंजूर झालेले नाही. परंतु ते तात्काळ मंजूर करावे व तातडीने खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. अनुदान तातडीने जमा न झाल्यास दि.15 नोव्हेंबर रोजी रास्तारेाकोचा इशारा सरपंच अंबादास गुजर यांनी दिला आहे.
मांजरसुंबा महसुल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु या भागातील 23 गावांमधील शेतकर्‍यांना अनुदान मंजूर झालेले नाही. जिल्ह्यात इतर ठिकाणी हे अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा होत असतांना मांजरसुंबा महसुल मंडळात मात्र याबाबतची कार्यवाही झालेली नाही. या शेतकर्‍यांना तात्काळ अनुदान मंजूर करण्याची मागणी दि.3 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. येत्या पाच दिवसात अनुदान मंजूर न झाल्यास सोलापूर - धुळे महामार्गावर मंझरी फाटा येथे शेतकर्यांसह रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच तथा सरपंच परिषदेचे बीड जिल्हा समन्वयक अंबादास गुजर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी  सफे पुरचे सरपंच श्रीराम घोडके  तांदळवाडीचे सरपंच पोपट काळे,  महारुद्र वाघ (खडकीघाट), विलास गावडे (बोरखेड),  नानासाहेब घलाळ (रत्नागिरी), मिनाबाई बहिरवाल (मांडवजली), स्मिता चौरे (खंडाळा), लालासाहेब सालगुडे (भांडरवाडी),  राजकुमार कदम (ससेवाडी) यांच्यासह शेतकरी संतोष डोंगर, तुकाराम धसे,बप्पा गुजर,समीर पठाण, तुकाराम डोंगर, बबन बहिरवाळ, संदीप पाटील,गजानन बहिरवाळ, बाबासाहेब बहिवाळ,  पप्पु बहिरवाल, कदम पंडित,रसाळ बाळासाहेब,सचिन काळकुटे, अमोल गुजर, हनुमान घोशीर,सुरेश मुसळे,वराडे , राजेंद्र बहिरवाळ,बाबुराव धसे, रावसाहेब गुजर उपस्थित होते.

आंदोलनाला पाठींबा


अतिवृष्टी अनुदानाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोरख शिंगण, शिवसंग्रामचे  युवा नेते रामहरी मेटे, धनंजय गुंदेकर, गणेश ढवळे ,यांनी  तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या प्रतिनिधींनी भेट दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा