Subscribe Us

header ads

ढेकणमोहा येथे विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले असुन रोज आत्महत्या घडत आहेत अशीच घटना पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथेल विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गोविंद शहादेव थापडे (वय ३२) वर्ष राहणार ढेकणमोहा या विवाहित तरुणाने आज (दिनांक १६) डिसेंबर वार गुरुवार रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान  स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला सुताच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोनवणे साहेब यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील आरोग्य केंद्रात पाठवला आहे.गोविंद थापडे हे वडवणी येथे लहान मुलांचे गुरुकुल चालवत असल्याची माहिती आहे .त्यांच्या पश्चात पत्नी . दोन मुलं .आई वडील. दोन भाऊ. बहिणी असा मोठा परिवार आहे. गोविंद थापडे यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र कळू शकले नाही पुढील तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सोनवणे साहेब हे करत आहेत. गोविंदच्या अश्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा