Subscribe Us

header ads

कुक्कडगाव खंडोबा मंदिर शेजारी परिसरात वाळू माफियाने कोट्यावधी रुपयांचे केले अवैद्य वाळू साठे; मात्र महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनचा दुर्लक्ष!!

बीड स्पीड न्यूज 

बीड प्रतिनिधी_बीड तालुक्यातील        कुक्कडगाव.चव्हाणवाडी.व या परिसरातील वाळू पट्ट्यात मध्यरात्री अवैधरित्या जेसीबी व इतर मशिनरी लाऊन वाळू उपसा करून साठा शालेय परिसरात व इतर ठिकाणी राजोरोस केला जात आहे.महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन मात्र थापा मारन्यात मग्न असतो तर मंडळ अधिकारी प्रतिक्रिया देण्यात व्यस्त असतो त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस कोट्यावधी रुपयांचा अवैध वाळू उपसा महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने दिवस-रात्र चालू आहे. खुंडरस,कुक्कडगाव,आडगाव नदीपात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू आहे.या वाळू माफियांच्या दादागिरीने ग्रामस्थ वैतागले आहेत दिवस-रात्र नदीपात्रातून होणाऱ्या 

अवैधरित्या वाळू उपसामुळे नदीपात्रात मोठे मोठे खड्डे झाले आहे. त्याचप्रमाणे या भागातील प्रमुख रस्ते देखील खराब झाले आहे.या वाळू अवैध पणाने उपसा करून जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पाठवली जाते त्यामुळे मंडळ अधिकारी यांचे  दुर्लक्ष आणि महिन्याच्या ठरलेल्या तारखेला जाणे हे वाळू माफिया साठी आनंदाची बाब आहे?? केवळ विशिष्ट लोकांना प्रतिक्रिया देऊन आम्ही वाळू उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई करतो असा बनाव करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब या गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष देऊन कुक्कडगाव.चव्हाणवाडीतील अवैध वाळू साठा उपशावर तलाठी.मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी चर्चा होत आहे. जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक राजास्वामीचे दुर्लक्ष वाळू माफिया रात्रीतून लखपती होत आहेत बीड तालुक्यातील कुक्कडगाव. चव्हाणवाडी बऱ्हाणपूर उंमरी मध्ये वाळू माफियांनी हैदोस घालून मंडळाधिकारी तलाठी यांच्या दुर्लक्षामुळे शंभराच्या जवळपास वाळूचे साठे 

उघड्यावर शाळेच्या परिसरात अवैधरित्या साठा करून ठेवले आहेत मात्र मंडळ अधिकारी याला प्रशासनाच्या कारभारामुळे कारवाई करायला वेळ नाही केवळ तलाठ्याच्या थापा मरण्यावरून हा अनागोंदी कारभार सुरू आहे. कुक्कडगाव.चव्हाणवाडीतील राजरोसपणे वाळू माफिया पोलिस प्रशासनाच्या व महसूल अधिकाऱ्यांच्या नाकावर टीचून हे अवैध वाळूचे धंदे सुरू आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचे वाळूसाठी केले आहेत त्या  कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पावले उचलावीत आणि ज्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे वाळू साठे ठेवले आहेत त्याठिकाणी तातडीने जाऊन ती वाळू जप्त करून वाळू माफिया वर कारवाई करावी अशी चर्चा आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा