Subscribe Us

header ads

लसीकरण प्रमाण कमी राहिल्यास कोरोना तिसऱ्या लाटेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंन्टच्या धोक्याची शक्यता अधिक-- जिल्हाधिकारी

लसीकरणात बीड जिल्हा राज्य सरासरी पेक्षा मागे

 

बीड, दि. २::- covid-19 या संसर्गजन्य आजाराचा धोका टाळण्यासाठी राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून बीड जिल्हा यामध्ये मागे राहिला आहे . अशा स्थितीत कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमायक्रॉनचा बीड जिल्ह्यात धोका अधिक वाढू शकतो. लसींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्यातील सर्व पात्र लोकसंख्येला लसीकरण होण्यासाठी वेगात प्रयत्न केले जावेत यासाठी निर्देशांवर तातडीने अंमलबजावणी केली जावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. कोरोना तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी घेतला.  यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अंबाजोगाई अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख हे उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील कोरोना उपचारांसाठी उभारण्यात आलेल्या कॉविड केअर सेंटर, कोविड रुग्णालये , ऑक्सीजन प्लांटची सद्यस्थिती आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.जिल्हाधिकारी म्हणाले , नवा व्हेरीयँट हा पूर्वीच्या विषाणू पेक्षा धोकादायक ठरू नये यासाठी जिल्ह्यात उपाय योजना होणे गरजेचे आहे. राज्याचा सरासरीपेक्षा जास्त बीड जिल्ह्यात लसीकरण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना सदर कोरोनाच्या संभाव्य लाटेमध्ये कमी नुकसान होऊ शकते. यासाठी शासन यंत्रणांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करावी मास्कचा वापर गरजेचा असून लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे,  असे जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, तसेच ते पुढे म्हणाले,  या नैसर्गिक आपत्ती साठी आपण सुसज्ज असणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा तील अधिकाऱ्यांनी यापूर्वी उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड रुग्णालये, जिल्हा कोविड रुग्णालये आदी ठिकाणच्या सुविधा पुन्हा तपासणी करून सुस्थितीत ठेवाव्यात रुग्णांसाठी ची औषधे , बेड्स , व्हेंटिलेटर , ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सीजन पुरवठा साखळी यासह जे  आवश्यक आहे त्या बाबींची पूर्तता केली जावी. संशयित कोरोना रुग्णांच्या स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढविण्यात यावे अशा सूचना दिल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राजा म्हणाले, कोरोनाचा नव्या लाटेचा धोका ओळखून प्रशासन एक होऊन काम करत आहे समजावून सांगायचे वेळ संपली असून आता कडक धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पवार म्हणाले, जगातील कमी लसीकरण झालेल्या देशाची स्थिती पाहता तेथे नव्या व्हेरीयँटी च्या मुळे गंभीर परिस्थिती होत आहे. लसीकरणामुळे मृत्यूचा धोका कमी होतो. यासाठी नागरिकांना लसीकरण करण्यास भाग पाडण्यात यावे . तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली ग्राम विकास , आरोग्य व महसूल यंत्रणेने इतर विभागांचा सहाय्याने येत्या काही दिवसात लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण होण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे.अपर जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे म्हणाले, जिल्ह्यात दररोज 30 हजार पेक्षा जास्त लसीकरण झाल्यास येत्या दहा दिवसात आपण राज्याच्या सरासरी जवळ जाऊ शकतो. प्रत्येक तालुक्यातील यंत्रणेने यासाठी दररोज किमान 2000, शहरात जास्त प्रमाणात पात्र नागरिकांचे लसीकरण करावे.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साबळे यांनी यावेळी कोविड केअर सेंटर व रुग्णालयांच्या सद्यस्थिती बद्दल माहिती सादर केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेख यांनी लसीकरणच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली.जिल्ह्यातील लसीकरण साठी पात्र 21 लक्ष 55 हजार 990 नागरिकांपैकी 14 लक्ष 15 हजार 592 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे तर सहा लक्ष 82 हजार 733 नागरिकांचा दुसरा डोस देखील पूर्ण झाला आहे . पहिला डोस घेण्याचे प्रमाण 65.66% व दुसरा डोस घेण्याचे प्रमाण 31.67  % आहे. जिल्ह्यातील नागरिकांना एकूण २० लक्ष 98 हजार ३२५ लसी चे डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ७ लक्ष 40 हजार 398 नागरिकांनी लसीचा कोणताही डोस घेतलेला नाही.यापूर्वी बैठकीमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना कार्यक्रम, जननी सुरक्षा कार्यक्रम , राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि एड्स जनजागृती अभियान आदी बाबतची माहिती सादर करण्यात आली.तसेच मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम बाबत माहिती देण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा