Subscribe Us

header ads

जिल्हा रुग्णालयातील कोट्यवधीच्या खरेदीत डॉक्टरांसह नातेवाईक कार्यकर्ते मालामाल!! बीड जिल्हा रुग्णालयात आमरण उपोषणास बसणार---दिपक थोरात

बीड स्पीड न्यूज 

बीड _जिल्हा रुग्णालयातील covid-19 .20. 21. या वर्षात कोरोना महामारी भारत सरकार महाराष्ट्र शासन व शासनाच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयातील औषध भांडार मध्ये जवळपास 85 कोटी ते 110 कोटी रुपयांचा खरेदी व्यवहार व जिल्हा रुग्णालयातील डागडुजीचे व इतर खर्च करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सूर्यकांत गीते आर एम ओ डॉक्टर सुखदेव राठोड तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे शेख रियाज सह अन्य व्यक्तीच्या नावाने व जिल्हा रुग्णालयातील इतर आजी माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून डॉ सुखदेव राठोड आदिनाथ मुंडे सुर्यकांत गिते यांनी खरेदी केली असून हि खरेदी व डागडूजी सुमारे 85 कोटी ते 110 कोटी रुपयांचा निधी हा अवाच्या सव्वा भाव लावून संबंधित खरेदी केलेली आहे. यामध्ये सध्या जिल्हा रुग्णालयातील नोकरीला असणारे महिला पुरुष कर्मचारी यामध्ये फार्मासिस्ट व डॉक्टर लॅब टेक्निशियन क्लार्क शिपाई यानी स्वाताच्या नातेवाईकांना पुढं करत त्यांच्या नावानं एजन्सीने टेंडर भरले व संबंधीत खरेदी केले यामध्ये कमी दरात ज्या एजन्सीला दिले पाहिजे त्या एजन्सीला न देता जास्त दराने खरेदी केलेल्या एजन्सीला संबंधित टेंडर दिले या मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक आर एम ओ औषध भांडार प्रमुख अन्य जनानी कोट्या रूपयाची खरेदी केली आहे यामध्ये डॉ सुखदेव राठोड है मुख्य सुत्रधार आहेत यांनी स्वत:च्या पदाचा गैरवापर करत अनेक खरेदी केलेल्या कामातून आर्थिक व्यवहार करून स्वत:ची व इतर जिल्हा रुग्णालयातील आजी माजी कर्मचारी यांना मालामाल केले आहे. यामध्ये बीड जिल्हा रूग्णालयासह इतर कोरोणा सेंटरला खरेदी केलेली सामग्री साहित्य मेडिसिन (आॅल मेडिसिन ) क्लाईमो ६२५ गोळ्या तर अक्षरशः दोन लाख गोळ्या खरेदी केल्या पण त्या एक्सपायर झाल्या रेमडेसिव्हर इंजेक्शन लॅब खरेदी सर्व सॅनिटायझर साधे मास्क एन_19 मास्क पी पी इ किट एच आय वी किट व्हेंटिलेटर मशीन व्हेटी मास्क बायपॅप मशीन बी एम डब्लू कॅरी बॅग दोन्ही प्रकारचे हॅडग्लोज व ओटू सप्लाय (कोवीड साठी लागणारे) जम्बो सिलेंडर ओटू बीड जिल्हा रुग्णालयात तसेच सर्व तालुका जिल्हा तील कोवीड सेंटर येथे किती खरेदी केले व ते कोठे आहेत ओटू सिलेंडर खरेदी एअर आॅक्सीजन प्लांट लिक्वीड प्लांट किती के.एल.(क्षमता) चे किती ल्किवीड आॅकसीजन प्लांट लिक्विड प्लांट खरेदी केले व उभारले व कोणाच्या आदेशाने व कोणते एजन्सीच्या माध्यमातून खरेदी केले त्याचे दर कोणी ठरवले कधी केले व कोणत्या एजन्सीच्या कमी दाराच्या मागणी असताना सुद्धा जास्त दराच्या एजन्सी लाच का देण्यात आले तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे बदली झालेली असताना मुंडे च्या कार्य काळामध्ये पलंग गादी उशीशी (तक्क्या) बेडशीट अंगावर ची चादर पांढरा यांची चादर सॅनिटायझर स्टॅन्ड आय व्ही स्टॅन्ड फिवर गंन मॉनिटर व्हेंटिलेटर पल्स आॅक्सी मिटर मशीन खरेदी मुंडे ठाकर शेख रियाज शेख एजाज यांनी काय व कोणती खरेदी केली तसेच जंबो सिलेंडरची खरेदी लहान-मोठे सिलेंडर डीपीटीसी नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय पालकमंत्री खासदार आमदार जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र शासनाकडून व भारत सरकारकडून आलेल्या निधीचा गैरवापर करत अव्वाच्यासव्वा भाव खरेदी करत यांनी खरेदी केली व स्वतः जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व इतर पदावर असणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचारी यामध्ये आजी-माजी कर्मचाऱ्यांनी स्वतः खरेदी करुन कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे मुख्य म्हणजे कोविड काळामध्ये rt-pcr लॅबचे पूर्ण कामकाज स्थापनेपासून कोणाच्या सांगण्यावरून व कोणाच्या आदेशावरून कोणाच्या नेतृत्वाखाली कोण अधिकारी आजपर्यंत पाहत आहे त्या अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीच्या नावाने म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी रक्ताच्या नात्यातच एजन्सी काढून बीड जिल्हा रुग्णालयातील लिक्विड प्लांट ऑक्सीजन प्लांट व सिलेंडर खरेदी केले एजन्सी चे नाव लवकरच समोर आणणार आहे तसेच इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक साहित्य फॅन ट्यूब पंखे कुलर एसी गरम पाणी हिटर रूम हिटर व सर्व दवाखान्याची लाईट फिटिंग वायरिंग व दवाखान्यातील कौरोणा वार्डातील फर्निचर व फरशी बांधकाम रिपेअरिंग सिस्टिम बसवली या फायर ऑडिट चा रिपोर्ट खरेदी बीड जिल्हा रुग्णालयातील आग विझवण्याचे स्प्रिंकलर सीसीटीव्ही खरेदी तसेच अन्य वेगवेगळ्या संबंधित खरेदी बीड जिल्हा रुग्णालयातून 85 कोटी ते 100 कोटी रुपयांचा घोटाळा व बीड जिल्हा रुग्णालयातील त्या डॉ व महिला कर्मचारी यांची व इतर कर्मचारी यांच्या नावाने लेखी तक्रार करून लवकरच कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आणणार आहे निवेदण देऊन उद्या जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणावर याअगोदर सुद्धा मी जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य उपसंचालक लातूर यांना निवेदन दिले होते परंतु माझ्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे मी याअगोदर सुद्धा आत्मदहनाचा इशारा दिला होता आत्मदहन करण्याचा प्रयत्न डॉक्टर सुखदेव राठोड यांच्या कक्षाबाहेर केला होता व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आमरण उपोषण केले होते पण माझ्या निवेदनाची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे मी कशी ते 110 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन बीड जिल्हा रुग्णालयात आमरण उपोषणास बसणार आहे यासाठी माझ्यावरती दबाव आणला जात असून मी भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून उपोषणास बसणार आहे आसा इशारा प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिपक थोरात यांनी दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा