Subscribe Us

header ads

बीड शहरात एचडीएफसी बँकेसमोर धारदार शस्त्राने वार करून खून

बीड स्पीड न्यूज 

बीड_ आज दुपारी 4 वाजता अज्ञात तीन ते चार जणाच्या टोळक्याने एका 24 वर्षीय तरुणावर सशस्त्र हल्ला चढवला. तरुणाच्या अंगावर तलवारीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने सदरील तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सदरची घटना बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर घडली. बीड शहरातील खासबाग भागात राहणारा  शेख शाहिद शेख सत्तार (वय 24) वर्ष या तरुणावर आज दुपारी 4 वाजता  बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर तीन ते चार तरुणांनी धारदार शस्त्राने वार केले. दिवसाढवळ्या सशस्त्र हल्लेखोरांनी तरुणावर सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हल्लेखोर कोण? याचा शोध पोलीस घेत असून एका संशयीताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा