Subscribe Us

header ads

पुतण्या आ.संदिप क्षीरसागरांचा माजी मंत्री काकाला पुन्हा दणका!राष्ट्रवादीचे राजुरी नवगणसह सात ग्रा.पं.सदस्य पोटनिवडणुकीत वर्चस्व

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदार संघातील नवगण राजुरीच्या ग्रामपंचायत पोट निवडणुकीत पुन्हा एकदा पुतण्या आ.संदिप क्षीरसागर यांनी काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना चांगलाच दणका दिला आहे. राजुरी ग्रामपंचायत सदस्यासह बोरफडी, कोळवाडी, भंडारवाडी, वासनवाडी, कामखेडा, वायभटवाडी येथील ग्रा.पं.सदस्य पोट निवडणुकीत दणदणीत विजय झाले असून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे या पोटनिवडणुकीत वर्चस्व सिद्ध झाले आहेे.नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणुक जाहिर झाली होती. ती जागा ताब्यात घेण्यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जोर लावला होता. या जागेवर झालेल्या मतदानानंतर मतमोजणी बुधवारी झाली. त्यामध्ये वैशाली ज्ञानेश्वर बहिर यांनी 365 मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. त्याचबरोबर बोरफडी, कोळवाडी, भंडारवाडी, वासनवाडी, कामखेडा, वायभटवाडी येथेही ग्रा.पं.सदस्य पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या ग्रा.पं.सदस्याच्या पोटनिवडणुकीमध्ये बीड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले असून आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पोटनिवडणुक ग्रा.पं.सदस्यांच्या निकालानंतर बीडमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा