Subscribe Us

header ads

वैतागवाडी येथे नवविवाहितेसह पतीची गळफास घेऊन आत्महत्या!

बीड स्पीड न्यूज 

नेकनूर_येथून जवळच असलेल्या वैतागवाडीमध्ये नवविवाहितेसह पती ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.16) समोर आली आहे.मयत महिला ही सात महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे.या घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव पोलीस कर्मचारी परमेश्वर सानप, प्रशांत क्षीरसागर,हे घटनास्थळी हजर झाले होते.नेकनूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे राजेश जगदाळे (वय-27) वर्षे आणि  पत्नी दिपाली राजेश जगदाळे (वय-24) वर्षे या दाम्पत्याने राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केली.दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून राजेश आणि दीपालीचा 11 महिन्यापूर्वी विवाह झाला होता.दीपाली ही सात महिन्याची गर्भवती असल्याची माहिती असून आत्महत्यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा