Subscribe Us

header ads

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे संस्कृती मिटकर व आदर्श देवकाते प्रथम

बीड स्पीड न्यूज 

(वृत्तसंकलन प्रतिनिधीःआत्माराम ढेकळे )

पुणेः- अध्यात्मिक गजानन ग्रुप मधील बाल संस्कार केंद्र  आणि सर्वशाखीय सोनार युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने " राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आॕनलाईन आयोजन करण्यात आले होते.त्यास उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.त्यामध्ये अनुक्रमे वयोगटानुसार संस्कृती मिटकर व आदर्श देवकाते यांना प्रथम क्रमांक मिळाला .या आयोजित केलेल्या राज्यस्तरीत चित्रकला स्पर्धेत पाच ते नऊ व दहा ते पंधरा  वयोगटातील बाल स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत दहा ते पंधरा वयोगटातील प्रथम संस्कृती सचिन मिटकर ,द्वितीय जयदीप नारायण  सोनार ,तृतीय किरण विठ्ठल काशीद,उत्तेजनार्थ तन्वी बळीराम आडे तसेच पाच ते नऊ वयोगटात प्रथम आदर्श सचिन देवकाते ,द्वितीय स्वर्णिमा महेश विसपुते ,तृतीय अवनी विनोद दुसाने ,उत्तेजनार्थ जान्हवी तुषार जाधव यांनी यश संपादन केले.प्रामुख्याने या स्पर्धेच्या आयोजनात अध्यात्मिक गजानन ग्रुप  पिंप्री चिंचवड -पुणे च्या अध्यक्षा योगगुरु सौ.अर्चना सोनार व सर्व शाखीय सोनार युवा सेना निगडी चे संघटक आशिष बागुल यांचा सहभाग होता.या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील  एकुण १७२ बाल स्पर्धकांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला.या आॕनलाईन स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गौरव सोनार व अजिंक्य सोनार यांनी मोलाचे परिश्रम घेतले. स्पर्धेत प्रथम ,द्वितीय ,तृतीय,उत्तेजनार्थ तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना लवकरच आयोजित कार्यक्रमात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.असे संयोजकानी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा