Subscribe Us

header ads

शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांना मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बीड उर्दू मुलींची येथे कर्तव्यरत असलेल्या शेख सलमा बेगम अब्दुल रशीद यांना मुंबई येथे राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.१०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे  मुंबईतील बोरीवली येथील व्हाइट पिकॉक बँक्वेट हॉल, शेठ डी.एम.हायस्कूल, दौलतनगर येथे अतिशय भव्य राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्यभरातील उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक शिक्षकांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सहकुटुंब सन्मानित  करण्यात आले. यामध्ये बीड शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या (उर्दू-मुलींची) सहशिक्षिका शेख सलमा बेगम यांना मराठवाडा शिक्षक आ. विक्रम काळे,आ. मनिषा चौधरी(दहिसर मतदारसंघ), अनिल गवस(सुप्रसिद्ध अभिनेते), वैशाली काकडे(प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई), संजय पाटील, सुधीर देसाई व १०० शिक्षक क्लब चे अध्यक्ष मगर सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख पाहुणे यांनी आपापले मनोगत व्यक्त करून आयोजित कार्यक्रमाकरीता १०० शिक्षक क्लब ऑफ जालना यांचे आभार व्यक्त करून पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षीकांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा