Subscribe Us

header ads

१४ महिन्याच्या मुलीचा मृतदेह बंधाऱ्यात आढळून आल्याने खळबळ!!


बीड स्पीड न्यूज 

नेकनूर_नेकनूर पासून जवळच असलेल्या नांदुरफाटा येथे एका १४ महिन्याच्या मुलीचा मृतदेह आज (दि.११) सकाळी बंधाऱ्यात तरंगताना आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला आहे.अक्षरा बाबासाहेब पडूळकर (वय-१४ महिने) असे त्या मयत मुलीचे नाव आहे.बाबासाहेब पडूळकर यांच्या घराशेजारी बंधारा असून अक्षरा कालपासून बेपत्ता होती.आज सकाळी तिचा मृतदेह बंधाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.नेकनूर पोलीस ठाण्याचे शेख मुस्तफा,श्री.क्षीरसागर,श्री. सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला असून तपासणीनंतर खरे कारण समोर  येईल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा