Subscribe Us

header ads

बायपास टू बायपास रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट -- शेख निजाम

बीड स्पीड न्यूज 

बायपास टू बायपास रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट - निजाम शेख

बीड शहरात संपूर्ण रस्ता सिमेंटचा इस्टिमेटमध्ये असताना डांबरचा कुणाच्या सांगण्यावरून बनवला जात आहे? - अशोक येडे

बीडकरांनी चांगल्या रस्त्यासाठी पुढाकार घ्यायलाच हवा - नंदू पिंगळे

दर्जेदार रस्त्यासाठी सर्वपक्षीय रस्ता कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

बीड (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या बायपास टू बायपास रस्त्याचे काम सध्या सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. इस्टिमेट सिमेंट रस्त्याची लांबी घटविण्यात आली आहे. डांबर होत असलेला रस्ता निकृष्ट बनवणे सुरू असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हा रस्ता दर्जेदार करावा अशी मागणी बीड शहरातील सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आली आहे. यामध्ये निजाम शेख, अशोक येडे, नंदू पिंगळे यांचा पुढाकार होता. राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत बीड शहरातून जाणाऱ्या बायपास टू बायपास हा सुरू असलेला रस्ता टिकणार नसून तात्काळ प्रशासनाने लक्ष घालावे व रस्त्याचे सुरू आसलेले काम दर्जेदार करून घ्यावे. सदर निधी कमी असेल तर निधी उपलब्ध आहे तितकाच रस्ता करावा मात्र दर्जाशी तडजोड करू नये. बीड शहरातील रस्ता सिमेंटचा करणे आवश्यक असताना शहरात देखील डांबरी रस्ता करण्याचा घाट घातला जात आहे.हा रस्ता टिकणारा नसून शहरात सिमेंट रस्ता होणे आवश्यक आहे. हा रस्ता बऱ्याच वर्षानंतर होत असून तो चांगलाच झाला पाहिजे अन्यथा संपुर्ण बीडकर आंदोलन उभा करतील असा इशारा बीड शहर दर्जेदार रस्ता कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. यावेळी एमआयएमचे निजाम शेख, आम आदमी पार्टीचे अशोक येडे, शिवसंग्रामचे नंदू पिंगळे यांच्यासह हनुमंत पवार, सातीराम ढोले, मोमीन जुबेर, सय्यद सनाउल्ला, खयूम इनामदार, सय्यद रेहमान आदींसह बीड शहरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा