Subscribe Us

header ads

बीड आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकासह एजंटावर लाचखोरीचा गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 

बीड आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षकासह एजंटावर लाचखोरीचा गुन्हा दाखल 

बीड_वाहनाची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी २ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरिक्षक रविकिरण नागनाथ भाड (मूळ गाव गौडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) आणि खासगी एजंट प्रवीण सीताराम गायकवाड (रा. गौतम बुद्ध कॉलनी, शाहू नगर, बीड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांनी १९ ऑक्टोबर २०२१ रोजी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक राहुल खाडे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रवींद्र परदेशी, अंमलदार श्रीराम गिराम, भारत गारदे, अमोल खरसाडे, म्हेत्रे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक