Subscribe Us

header ads

पाटोदा बेलखंडीची सेवा सोसायटी आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या ताब्यात

बीड स्पीड न्यूज 

पाटोदा बेलखंडीची सेवा सोसायटी आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या ताब्यात


बीड (प्रतिनिधी):- पाटोदा बेलखंडी,कचरवाडी, दत्तनगर ता.बीड सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादीचे युवा नेते आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात आली आहे. अटीतटीच्या लढतीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे गोरख वाळके हे पाटोदा बेलखंडीच्या सेवा सोसायटीचे चेअरमन झाले आहेत. सर्व नुतन संचालक चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा आ.संदिप भैय्या क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.बीड तालुक्यातील पाटोदा बेलखंडी,कचरवाडी, दत्तनगर ता.बीड सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणुक पार पडली. चेअरमनपदी 

आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या गटाचे गोरख साहेबराव वाळके तर व्हाईस चेअरमन पदी शिवसंग्राम गटाचे संजय माने यांची निवड झाली. संचालक म्हणून प्रभु बडगे, बाळासाहेब बडगे, हरिकिसन वणवे, मारोती जाधव, विलास माने यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे तालुका दुध संघाचे अध्यक्ष विलास बडगे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या ताब्यात सेवा सोसायटी आणण्यासाठी या निवडणुकीत माजी सरपंच अमोल माने, प्रकाश शहाणे, विलास माने, पंडित माने, मच्छिंद्र माने, लक्ष्मण बांगर, दत्तात्रय वनवे, श्रीरंग वनवे, अर्जुन तुपे, राम जाधव आदींनी महत्त्वाची भूमिका निभावली. नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक