Subscribe Us

header ads

गोवर्धन नगर भव्य क्रिकेट प्रीमिअर लिगचे आयोजन


बीड स्पीड न्यूज 


गोवर्धन नगर भव्य क्रिकेट प्रीमिअर लिगचे आयोजन
22 फुेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन



बीड, दि.13 (लोकाशा न्युज)ः- ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून तालखेड सर्कलमधील तरूणांकडून एकत्र येत संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त जि.के.चव्हाण साहेब सामाजिक प्रतिष्ठाणकडून गोवर्धन नगर क्रिकेट प्रीमिअर लिगचे गोवर्धन नगर फाटा अनुष्पा टी-हाऊसच्या पाठीमागे क्रिकेट ग्राऊंडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
खेड्यापाड्यातील तरूणांना संधी मिळत नसल्याने त्यांच्या कला गुणांना वाव देता आले नाही. त्याच तरूणांच्या कलागुणांना वाव मिळावे यासाठी उपसंपादक नितीन चव्हाण यांच्या कल्पनेतून आकर्षक बक्षीसाचे नियोजन करत गोवर्धन नगर क्रिकेट प्रीमिअर लिगचे आयोजन करण्यात आले आहे. यात सोनाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा भाजप युवानेते राहूल जगताप यांच्याकडून प्रथम पारितोषीक 31 हजार रूपयाचे, जि.प.सदस्य अ‍ॅड.शरद चव्हाण यांच्याकडून द्वितीय पारितोषीक 21 हजार रूपये, राजेछत्रपती अर्बन 

बँकेचे चेअरमन डॉ.कैलास काठवडे पाटील यांच्याकडून तृतीय पारितोषीक 11 हजार रूपये व डॉ.धोडींराम चव्हाण, ग्रा.पं.सदस्य कैलास पवार, डॉ.युवराज चव्हाण यांच्याकडून उत्तेजनार्थ 6 हजार रूपयाचे असे भरघोस बक्षीसांचे आयोजन करण्यात आले आहे. या लिंगचे संत, महंत तसेच सर्कलमधील विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 22 फेबुवारी रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धन नगर शहरापूर मजरा अनुष्पा टी-हाऊसच्या पाठीमागील क्रिकेट ग्राऊंडमध्ये उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त तरूणांनी या लिंगमध्ये भाग घेण्याचे आवाहन जि.के.चव्हाण साहेब सामाजिक प्रतिष्ठाणकडून करण्यात आले आहे. टीमच्या नोंदणीसाठी नितीन चव्हाण मो.9689959088, लखन जाधव  मो.9545939250, सुशिल राठोड मो.9850767429 व सुशिल चव्हाण मो.9146438244 यांच्याकडे संपर्क करून करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा