Subscribe Us

header ads

बीडचे माजी नगराध्यक्ष रणजीतसिंह चौव्हाण यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 


बीडचे माजी नगराध्यक्ष रणजीतसिंह चौव्हाण यांचे निधन 


बीड दि. 22 (प्रतिनिधी):- येथील पेठ बीड भागातील रहिवाशी असलेले बीडचे माजी नगराध्यक्ष रणजीतसिंह चौव्हाण यांचे पुणे येथे उपचार चालू असतांना सोमवारी रात्री 10 वाजून 22 मिनीटांनी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 वर्ष होते. रणजीतसिंह चौव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. दीर्घ काळ ते बीड नगर पालिकेचे सदस्य होते. सामाजिक कार्यात नेहमी त्यांचा पुढाकार असायचा. बीड शहरातील खंडेश्वरी, कंकालेश्वर संस्थानचे ते अध्यक्ष होते. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची प्रकृती आणखीच खालावली. सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रणजीतसिंह चौव्हाण यांच्या पार्थिवावर आज मंगळवार दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता मोंढा भागातील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा