Subscribe Us

header ads

हातचलाखी करुन रुग्णांच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या भामट्यास शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक

बीड स्पीड न्यूज 


हातचलाखी करुन रुग्णांच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या भामट्यास शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक


बीड_ हातचलाखी करुन रुग्णांच्या नातेवाईकांना लुटणाऱ्या भामट्यास शिवाजीनगर पोलिसांनी १५ फेब्रुवारी रोजी अटक केली. यापूर्वीही त्याने अनेक जणांना फसविल्याची माहिती समोर आली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.गुलाब दिगंबर बनसोडे (४०, रा. राडी तांडा ता. अंबाजोगाई, हमु. जुनी भाजी मंडई, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे.१५ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील एका खासगी एमआरआय रुबी सेंटरवर पत्नीच्या तपासणीसाठी एक व्यक्ती आला होता. तपासणीनंतर बाहेर पडल्यावर सदरील व्यक्तीला गाठून गुलाब बनसोडे याने त्यांच्याशी ओळख असल्याचा बहाणा करत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदरील व्यक्तीही त्यांच्या बोलण्यास  अडकला हातचलाखीने नंतर गुलाब बनसोडे याने त्यांच्याकडील १५ हजार रुपये काढून घेत तेथून पोबारा केला. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित व्यक्तीन आरडाओरड करत रडायला सुरुवात केली यावेळी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस अंमलदार मोहसी शेख हे दुचाकीवरुन गस्त घालत होते. त्यांनी विचारपूस केल्यावर  घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर खासगी सीसीटीव्ही तपासले असता त्यात संशयि गुलाब बनसोडे आढळला. त्यानंतर शेख मोहसीन यांनी मोठ्या शिताफीने गुलाब बनसोडे यास पकडून चौकशी केली, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर त्याच्यावरील संशय बळावला. त्यामुळे त्यास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले, तेथे पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने पत्नीकडे ठेवलेले १५ हजार रुपये काढून दिले. दरम्यान, सदरील व्यक्तीने तक्रार दिली नाही. मात्र, डिसेंबर २०२१ मध्ये एका निवृत्त कर्मचाऱ्यास गुलाब बनसोडे याने बँकेतून पैसे काढून घरी परतताना लुटले. या प्रकरणात त्यास अटक करण्यात आली.


चार दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, गुलाब बनसोडेला १६ रोजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याकडे कसून चौकशी सुरु असून त्याने अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे. अधिक तपास सुरु असल्याचे हवालदार एन.ए. काळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा