Subscribe Us

header ads

छत्रपती शिवाजी महाराज चौकात झेंडा विक्रीवरून वाद; दोन गटांत तुंबळ हाणामारी

बीड स्पीड न्यूज 

छत्रपती शिवाजी महाराज चौकात झेंडा विक्रीवरून वाद; दोन गटांत तुंबळ हाणामारी


बीड प्रतिनिधी_  झेंडा विक्रीच्या कारणावरून दोन गटात वाद झाला या किरकोळ शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटातील तरुण भररस्त्यात एकमेकांना मारहाण करीत होते.  या हाणामारीत लाठ्या काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. ही घटना बीडच्या  छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली आहे.अचानक  झालेल्या या घटनेने थोडा 

काळ तणाव निर्माण झाला होता. याशिवाय वाहतूक देखील बऱ्याच काळ खोळंबून राहिली होती. तब्बल पंधरा मिनिटानंतर दोन्ही गटातील वाद शांत झाला. भररस्त्यात दोन गटात हा वाद सुरु होता. या वादामुळे वाहतूक बराच वेळ खोळंबून राहिली होती.तरुणांनी हातात काठ्या घेतल्यानं या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हा वाद शांत करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांना शांत केले आणि जमावाला पांगवले. वेळीच पोलीस दाखल झाल्याने हा वाद मिटला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा