Subscribe Us

header ads

सिरसदेवीत दोन तरुणांवर तलवारीने हल्ला; एक गंभीर

बीड स्पीड न्यूज 

सिरसदेवीत दोन तरुणांवर तलवारीने हल्ला; एक गंभीर

गेवराई_गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील शेख समीर शेख अमीन हा आपल्या शेतात झोपलेला असताना रात्री एकच्या सुमारास शेख रईस शेख इसुफ, शेख अनिस, शेख इनुस इसुफ या तिघांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून समीरवर तलवारीने मानेवर, पायावर, पोटावर, हातावर सपासप वार केले आणि फरार झाले. या घटनेमध्ये समीर सोबत असलेल्या शेख जावेद शेख वाहेद या मुलावर देखील वार करण्यात आले. ही घटना रात्री सिरसदेवी येथील बेंडकी या ठिकाणी घडली असून शेजारी राहत असलेल्या लोकांनी आरडाओरडा ऐकल्यानंतर धावत जाऊन जखमी समीरला तातडीने उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले.दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून शेख समीर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा