Subscribe Us

header ads

बीड स्पीड च्या दणक्याने वाकनाथपुर दलीत वस्तीच्या नाली बनवण्याच्या कामाला सुरुवात

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


बीड स्पीड च्या दणक्याने वाकनाथपुर दलीत वस्तीच्या नाली बनवण्याच्या कामाला सुरुवात 





वाकनाथपुर प्रतिनिधी_बीड तालुक्यातील वाकनाथपुर या गावातील दलीत वस्तीचा विकास होत नव्हता वाकनाथपुर येथील दलीत वस्तीतील नाल्याचे काम गेले वीस ते पंचवीस वर्ष पूर्वी केले होते. तेव्हा पासुन दलीत वस्तीतील नाली सफाईचे काम झाले नव्हते एक ते दोन वेळेस रोड चे काम झाल्याने नाल्या रोड पेक्षा खाली झाल्या होत्या आणि नाली सफाईचे काम न झाल्याने नालीचे पाणी पूर्ण रोड वरुन वाहत होते. अनेक वेळा 

ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडून देखील नाली सफाईचे काम होत नव्हते याचीच दखल घेत बीड स्पीड ने रोड वरुन वाहणाऱ्या नालीच्या पाण्याच्या फोटो सोबत बातमी प्रसिद्ध केली याचीच  ग्रामसेवक आणि सरपंच यांनी दखल घेत आज दिनांक १३ जानेवारी रोजी ७० ते ८०  फूट नाली बनवण्याच्या कामाला सुरुवात केली. आणि राहिलेल्या नालीचे काम लवकरच पूर्ण होईल असे गावचे सरपंच गोरख घाडगे यांनी सांगितले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा