Subscribe Us

header ads

बीड जिल्हा प्रमुख पदाचा प्रभार अनिल जगताप यांच्याकडे

बीड स्पीड न्यूज 

बीड जिल्हा प्रमुख पदाचा प्रभार अनिल जगताप यांच्याकडे

बीड/प्रतिनिधी_बीड जिल्हा शिवसेनेच्या प्रभारी जिल्हाप्रमुख पदी अनिल दादा जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे जिल्हाभरात स्वागत केले जात आहे. बीड जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रमुख पद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून होती. शिवसेनेच्या मुखपत्र सामना या दैनिकातून आज ठीक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बीड जिल्हा प्रमुख म्हणून अनिल दादा जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शिवसैनिकात आनंद व्यक्त केला जात असून बीड जिल्हा शिवसेनेत आता पुन्हा एकदा 'जगताप पर्व सुरु झाले आहे. पक्षाने बीड जिल्हा प्रमुख पदाचा प्रभार अनिल जगताप यांच्याकडे दिला आहे. गुटखा प्रकरणात कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाई झाल्यानंतर चार महिन्यांपासून हे पद रिक्त होते. अनिल जगताप या पुर्विही १३ वर्ष शिवसेना जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत. ऐन निवडणूकांच्या तोंडावर अनिल जगताप यांच्याकडे आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अनिल दादा जगताप यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा