Subscribe Us

header ads

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुणेच्या वतीने आत्मलिंग शेटे यांना गुणीजन रत्न पुरस्काराने सन्मानित

बीड स्पीड न्यूज 


मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुणेच्या वतीने आत्मलिंग शेटे यांना गुणीजन रत्न पुरस्काराने सन्मानित

पुणे (प्रतिनिधी):- परळी येथील गेली तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात एक निष्ठेने काम करणारे परळी समाचार चे संपादक तथा लिंगायत सघंर्ष समितीचे जिल्हा संघटक आत्मलिंग शेटे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी च्या वतीने दिनांक 10 मार्च रोजी सदाशिव पेठ पुणे येथील श्री उद्यान मंगल कार्यालयामध्ये पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय गुणीजन दर्पण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पुरस्कार ही प्रेरणा देतात व प्रेरणेनेच राष्ट्र मोठे होते असे ब्रीदवाक्य असलेल्या या सामाजिक कार्य करणार्‍या संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला या संस्थेच्या वतीने गेली बावीस वर्षापासून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते संपादक आत्मलिंग शेटे यांनी  पत्रकारितेच्या माध्यमातून केलेले कार्य हे प्रेरणादायक असून त्यांची सामाजिक धार्मिक कार्यातही मोठे योगदान असल्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार दिला असल्याची माहिती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प. माननीय श्री शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांनी दिली या समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रमेश आव्हाड तर प्रमुख पाहुणे म्हणून  विशाखापटनम येथील इंटरनॅशनल नॅशनल टॅलेंट आयकॉन श्रीमती जे. 

सानिपीनाराव राव  तसेच या परिषदेचे समन्वयक श्री प्रकाश सावंत लक्ष्मण दाते अमोल सुपेकर समाजसेविका सौ मीनाक्षी गवळी तसेच सुप्रभात महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ सुवर्णाताई निलेश खेडेकर सह इतर मान्यवर उपस्थित होते आत्मलिंग शेटे यांचा ज्येष्ठ साहित्यिक सुरेशजी आव्हाड व मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, गौरवपदक, सन्मानचिन्ह, व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला श्रीमती सानापिनाराव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की समता, स्वातंत्र्य, व बंधुता ही मूल्ये समाजात रुजवण्यासाठी सर्व गौरव करण्यात आलेल्या मान्यवरांनी आपापल्या भागात पथदर्शी प्रकल्प राबवावेत असे आव्हान केले याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार ही करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण तज्ञ सौ मनीषा कदम यांनी केले. कार्यक्रमात सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून राष्ट्र वंदना करण्यात आली. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आत्मलिंग शेटे यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा