Subscribe Us

header ads

परळीत पंकज कुमावतांच्या पथकाची गुटख्यावर धाड;दोन लाखांचा गुटखा ताब्यात

बीड स्पीड न्यूज 

परळीत पंकज कुमावतांच्या पथकाची गुटख्यावर धाड;
दोन लाखांचा गुटखा ताब्यात 

परळी-:केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परळीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड मारून 2 लाखांचा गुटखा ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघे फरार आहेत. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.परळी येथे सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या राघव इन्टरप्राजेस या किराणा दुकानात गुटख्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच त्यांनी धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी राधेश्याम मुरलीधर लाहोटी यांच्या दुकानात छापा मारला. त्या छाप्यात परळी येथील सुभाष चौकातील सरस्वती शाळेच्या बाजूला असलेल्या राधेश्याम मुरली लाहोटी यांच्या दुकानात धाड टाकली. या धाडीत पोलीस पथकाला गोवा गुटखा, बाबा पान मसाला, रॉयल तंबाखू, विमल पान मसाला, आर एम डी पान, आर एम डी सेंटेड तंबाखू, राजनिवास पान मसाला, जाफराणी जर्दा, व्ही वन तंबाखू, प्रिमियम जाफराणी जर्दा, सुगंधित जर्दा व एक्का तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ असलेला 80 हजार 943 रु.किंमतीचा माल मिळून आला. तसेच वैभव बुरांडे यांच्या विद्यानगर भागातील घरी पंकज कुमावत यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, राजू वंजारे व गृहरक्षक दलाचे जवान पवार यांनी धाड टाकली. त्यात विद्यानगर नगर यातील वैभव बुरांडे याच्या घरी पोलीस पथकाला बाबा पान मसाला, रॉयल तंबाखू, विमल पान मसाला, आर एम डी पान मसाला आणि सेंटेड तंबाखू 1 लाख 30 हजार 910 रु. किंमतीचा आरोग्याला हानिकारक आणि राज्यात बंदी असलेला तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा जप्त केला. या दोन ठिकाणी पंकज कुमावत यांच्या पथकाने 2 लाख 11 हजार 853 रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव आणि पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून संभाजी नगर पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाणे परळी येथे चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपीला ताब्यात घेतले असून तीन आरोपी फरार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा