Subscribe Us

header ads

बोगस दस्तावेज तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न; अंबाजोगाईच्या भूमी अभिलेख उपअधीक्षकासह सहा जणांवर गुन्हा

बीड स्पीड न्यूज 

बोगस दस्तावेज तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न; अंबाजोगाईच्या भूमी अभिलेख उपअधीक्षकासह सहा जणांवर गुन्हा


अंबाजोगाई_ जमिनीचे बनावट दस्तावेज आणि चुकीचा मोजणी नकाशा तयार करून ८६ वर्षीय वृद्धाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीत अंबाजोगाई येथील भूमी अभिलेख अधिकाऱ्याचाही समावेश आहे.वसंत धोंडीबा भावठणकर (वय ८६, रा. हाऊसिंग सोसायटी, अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीनुसार, शहरातील गट क्र. ४७३ मध्ये त्यांच्या मालकीची १ हेक्टर ३१ गुंठे जमीन आहे. सदर जमिनीच्या उत्तरेकडे शेजारी असलेली जमीन शंकरराव सटवा जाधव यांच्या मालकीची असून त्यांनी त्याची १९८८ साली विक्री केली. सध्या भावठणकर यांच्या उत्तरेकडे शंकरराव जाधव यांची कसल्याची प्रकारची जमीन नाही. त्यानंतर शंकर जाधव यांचे एकमेव वारस असल्याचे भासवून भीमराव शंकरराव जाधव आणि पद्मीनबाई भीमराव जाधव यांनी चुकीच्या नोंदी आधारे पूर्वीच विकलेल्या जमिनीच्या चतुःसीमा टाकून हमीद सुलेमान गवळी आणि शेख निसार पाशामीर शाह शेख यांना बोगस खरेदीखत करून दिले. तसेच, या चौघांनी भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक राजेश लोंढे आणि उपअधीक्षक मनोज संधान यांच्याशी संगनमत करून खोटा, बनावटी मोजणी नकाशा तयार केला व भावठणकर यांची जमीन स्वतःची असल्याचे भासवून त्यांना जमिनीवरून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. याबाबत वसंत भावठणकर यांचे नातू अभिजीत यांनी बीडच्या भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्यांनी सदरील नकाशा रद्द केला असे फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून हमीद सुलेमान गवळी, शेख निसार पाशामीर शाह शेख, भीमराव शंकरराव जाधव, पद्मीनबाई भीमराव जाधव, मनोज संधान आणि राजेश लोंढे या सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ४६८, ४६९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.कॉ. सोनेराव बोडखे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा