Subscribe Us

header ads

उद्या शिव प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे केज शहरात होणार शिव व्याख्यान व मान्यवरांचा गौरव .

बीड स्पीड न्यूज 

उद्या शिव प्रतिष्ठानच्या वतीने प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे  केज शहरात होणार शिव व्याख्यान व मान्यवरांचा गौरव .

केज / प्रतिनिधी _केज तालुका शिवसेना व शिव साई प्रतिष्ठान,केज यांच्या वतीने तिथीप्रमाणे होणार्‍या शिवजयंती निमित्त दिनांक १३ मार्च २०२२ रविवारी  वकिलवाडी हनुमान मंदिर समोरील मैदानात शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे.तसेच विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे यामध्ये कोविड- १९ च्या काळात उल्लेखनीय कार्य करणारे केजचे तहसीलदार श्री .दुलाजी मेंडके, केज उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डाॕ.संजय राउत,पञकारीता क्षेत्रात सातत्यपुर्वक सेवा करत असलेले आदर्श पञकार श्री.दिपक देशपांडे, उद्योग रत्न पुरस्कार श्री .विकासअप्पा मिरगणे,केज भुषण पुरस्कार केज येथील रामकृष्ण परिवाराचे विवीध धार्मिक कथाकार तसेच आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. समाधान महाराज शर्मा,केज समाज भुषण पुरस्कार प्रा.हनुमंत भोसले, पर्यावरण संवर्धनासाठी केज येथील भाउसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.हनुमंत सौदागर ,जलदुत पुरस्कार सौ.कोमल संतोष शिनगारे यांना प्रदान करण्यात येणार आहे .तरी केज  शहरातील व परिसरातील शिवप्रेमी व शिवभक्तांनी सदर व्याख्यानाचा व पुरस्कार सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  शिवसेना केज तालुका प्रमुख तथा शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रत्नाकर अप्पा  शिंदे तसेच शिव प्रतिष्ठानचे सचीव श्री .अरविंद थोरात यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा