Subscribe Us

header ads

विश्वनाथबाबा प्रतिष्ठापना तृतीय वर्ष सोहळा उत्साहात संपन्न

बीड स्पीड न्यूज 


(वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे)


विश्वनाथबाबा प्रतिष्ठापना तृतीय वर्ष सोहळा उत्साहात संपन्न

पुणे -  येथील गंगाधाम परिसरातील स्थापन ॐ साई -विश्वनाथबाबा प्रतिष्ठापना तृतीय वर्ष  सोहळा उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरे करण्यात आले.ॐ श्री साई विश्व नरेंद्र या ठिकाणी  सद्गुरु श्री विश्वनाथबाबा प्रतिष्ठापनाच्या तृतीय वर्षीय सोहळ्यामध्ये आयोजित कार्यक्रमात  भजन ,सामुदायिक आरती,पालखी मिरवणूक,शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने या सर्व कार्यक्रमाचा  भाविकजनांनी उत्साहाने लाभ घेतला.   संयोजक संतोषजी रांका उर्फ साईराजबाबा व सौ.नीताजी रांका  यांनी उपस्थित भाविकांना स्नेहपुर्वक आशिर्वाद दिला.या कार्यक्रमात प्रामुख्याने लहान  मुलांपासुन ते स्त्री ,पुरुषांनी  भजन-गीत गायन प्रसंगी मनमोहक नृत्य करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.यामध्ये पिंपरी चिंचवड भागातील काशी विश्वेश्वर भजनी मंडळाचे अखिलेश शुक्ला -पंडीत यांचा विशेष सहभाग होता.विविध ठिकाणाहून भाविकजन श्रध्देने उपस्थित होते.शेवटी महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा